वरळी हिट ॲण्ड रन प्रकरण, मिहीर शहाची नशेत कार चालवण्याची कबुली
मुंबई, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वरळी हिट ॲण्ड रन प्रकरण सध्या चर्चेत आहे. या प्रकरणी अटक करण्यात आलेला आरोपी मिहीर शहाने अपघाताच्या वेळी स्वत: कार चालवत असल्याची कबुली बुधवारी पोलिसांना दिली आहे. तसेच सुरुवातीला दारूच्या नशेत गाडी चालवल्याला नकार दिलेल्या मिहीरने पोलिसांनी पुरावे समोर ठेवताच हो नशेत होतो, अशी कबुली दिली आहे. मुंबई पोलिसांकडून त्याची सखोल चौकशी सुरू आहे.
“वरळी अपघातानंतर मी आणि कुटुंबीय घाबरलो होतो. त्यामुळे मी पळालो. मुंबई पोलिसांनी अधिक तपास केला असता त्याने मद्यप्राशन केले होते, हे सिद्ध झालं आहे. एवढंच नव्हे तर त्याने दोन वेगवेगळ्या ठिकाणी मद्यप्राशन केलं होतं, असंही मुंबई पोलीस म्हणाले आहेत. मिहीर शाहला बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्याला १६ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, अपघातानंतर कुटुंबावर हल्ला होईल या भीतीने आम्ही घर सोडले, असे मिहीरने चौकशीदरम्यान सांगितले आहे. तसेच मिहिरने आपल्याकडे चालक परवाना असल्याचे सांगितले आहे. पण अद्याप कुटुंबियांनी त्याचा चालक परवाना पोलिसांना दिला नसल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. याप्रकरणी आतापर्यंत १४ जणांची चौकशी करण्यात आली आहे.
ML/ML/PGB
11 July 2024