वरळी कोळी महोत्सवात संस्कृती, परंपरेची मेजवानी
मुंबई, दि. ३१
समुद्राच्या फेसाळणाऱ्या लाटा, थंड हवेची झुळूक आणि सोबतच गरमागरम झिंगा फ्राय, बोंबील, झणझणीत तिखले, भरलेले खेकडे याचा आस्वाद घेण्याची संधी वरळी कोळी महोत्सवात खवय्यांना घेता येणार आहे. वरळीत ‘कोळी खाद्य महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. येत्या ३१ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर या काळात वरळी सी फेस, स्वर्गीय बिंदुमाधव ठाकरे चौकासमोर भव्य कोळी महोत्सव रंगणार आहे. यंदा या महोत्सवाचे ११ वे वर्ष आहे.
कोळी बांधव म्हणजे मुंबईचे मूळ रहिवासी. मुंबईत प्रत्येक कोळीवाड्यात त्यांनी आपली परंपरा आणि संस्कृती जपलेली दिसून येते. हीच कोळी बांधवांची खरी ओळख आहे. त्यातील महत्त्वाचा भाग म्हणजे त्यांची वैशिष्ट्यपूर्ण खाद्य संस्कृती, त्यांचे मसाले,
मासे बनवण्याची पद्धत आणि त्याची लज्जत. याच खाद्य संस्कृतीची ओळख मुंबईकरांना व्हावी आणि ती टिकावी या उद्देशाने दरवर्षी वरळी कोळी खाद्य महोत्सवाचे आयोजन केले जाते. यंदाही महोत्सवाच्या माध्यमातून लज्जतदार कोळी खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्याची संधी मुंबईकरांना मिळणार आहे. त्यामुळे सर्वांनी आवर्जून महोत्सवाला भेट द्यावी, .
या महोत्सवाचे खास आकर्षण म्हणजे
१ नोव्हेंबर रोजी- कोळीगीतांचा कार्यक्रम ‘नाखवा माझा, दर्याचा राजा या कोळीगीतांचा कार्यक्रम 1 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी होणार असून खेळ खेळला दर्यावरी या
कोळीनृत्याचा कार्यक्रम 2 नोव्हेंबर रोजी होणार असल्याचे आवाहन वरळी सागरी कोळी महोत्सव समितीचे अध्यक्ष अभिजीत पाटील, सरचिटणीस आकर्षिका पाटील यांनी केले आहे.KK/ML/MS