या जगतविख्यात भारतीय वकीलांनी केला तिसरा विवाह

 या जगतविख्यात भारतीय वकीलांनी केला तिसरा विवाह

मुंबई, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :

भारतातील सर्वांत महागडे वकील म्हणून ख्याती असलेले माजी सॉलिसिटर जनरल हरीश साळवे यांनी आज तिसरा विवाह केला आहे. ६८ वर्षीय साळवे यांनी लंडनमध्ये ब्रिटीश महिला ट्रिना यांच्याशी विवाह केला. या लग्न समारंभासाठी उद्योगपती मुकेश अंबानी आणि त्यांच्या पत्नी नीता अंबानी, आयपीएलचे माजी अध्यक्ष ललित मोदी, सुनील मित्तल, एलएन मित्तल, एसपी लोहिया, गोपी हिंदुजा यांच्यासह अनेक मोठे उद्योगपती उपस्थित होते.

साळवे यांनी १९८२ मध्ये मीनाक्षी )यांच्याशी विवाह केला होता. ३८ वर्षांच्या लग्नानंतर जून २०२० मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्यांना साक्षी आणि सानिया या दोन मुली आहेत.मीनाक्षी यांच्याशी घटस्फोट झाल्यानंतर हरिश साळवे यांनी कॅरोलिन ब्रॉसार्ड यांच्याशी त्यांचे लग्न झाले होते.

हरीश साळवे हे केंद्र सरकारच्या नव्याने स्थापन झालेल्या वन नेशन-वन इलेक्शन समितीचे सदस्य आहेत. कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने हेरगिरीच्या आरोपाखाली फाशीची शिक्षा सुनावली होती. यावेळी जाधव यांच्या बाजूने खटला लढण्यासाठी साळवे यांनी फी म्हणून अवघा १ रुपया आकारला आणि यामुळे त्यांची खूप प्रशंसा झाली होती. ते 1999 ते 2002 पर्यंत देशाचे सॉलिसिटर जनरल होते. 2015 मध्ये, हरीश साळवे यांनी सलमान खानची 2002 मधील हिट-अँड-रन केस लढली होती.

टाटा ग्रुप, मुकेश अंबानी यांचा रिलायन्स इंडस्ट्रीज आणि आयटीसी ग्रुप हे त्यांचे काही प्रमुख ग्राहक आहेत. तसेच अनिल अंबानींच्या रिलायन्स नॅचरल रिसोर्सेस लिमिटेड विरुद्ध कृष्णा गोदावरी बेसिन गॅस वाद प्रकरणातही त्यांनी बाजू मांडली होती.

SL/KA/SL

4 Sept 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *