टाटा पॉवरचा शेअर आला या कारणामुळे तेजीत

 टाटा पॉवरचा शेअर आला या कारणामुळे तेजीत

मुंबई,दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गेल्या एका महिन्यात टाटा पॉवरच्या शेअरच्या किमती ११ टक्क्यांहून अधिक वाढल्या आहेत. तर, सहा महिन्यांत शेअरच्या वाढीचा दर २३ टक्क्यांहून अधिक आहे.याला कारणीभूत ठरला आहे हरित ऊर्जा निर्मितीशी संबंधित एक करार. टाटा पॉवरच्या शेअरमध्ये तुफान तेजी आली आहे.टाटा पॉवरनं मोटेल हॉटेल्ससोबत ६ मेगा वॅटच्या एसी प्रकल्पासाठी करार केला आहे. हा करार शेअरमध्ये वाढीचं कारण ठरला आहे.

टाटा पॉवरचा शेअर आज सुमारे दीड टक्क्यांनी वाढून २५९.१० वर जाऊन पोहोचला. मागच्या पाच दिवसांत शेअरमध्ये ५.२६ टक्क्यांची वाढ झाली आहे. आज २६२.३० वर पोहोचलेल्या टाटा पॉवरच्या शेअरनं मागील ५२ आठवड्यांच्या उच्चांकाची नोंद केली. सहा महिन्यांपूर्वी या कंपनीत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांनी घसघशीत नफा कमावला आहे. एनएसईवर टाटा पॉवरचा ५२ आठवड्यांचा नीचांकी भाव १८२.३५ रुपये प्रति शेअर इतका आहे.

हरित ऊर्जा निर्मितीशी संबंधित हा नवीन प्रकल्प १३.७५ दशलक्ष युनिट्स क्लीन ऊर्जा तयार करणार आहे. अक्षय्य ऊर्जा स्रोतांपासून ही ऊर्जा तयार केली जाणार आहे. टाटा पॉवरला आपलं हरित ऊर्जा निर्मितीचं लक्ष्य लवकरात लवकर पूर्ण करायचं आहे. वर्षाला ५,५०० टन कार्बन उत्सर्जन कमी करण्याचा कंपनीचा विचार आहे.

SL/KA/SL

4 Sept. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *