ब्रम्हपुरीत रंगणार महिला महाराष्ट्र केसरी कुस्तीचा रणसंग्राम

चंद्रपूर, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ब्रम्हपुरी शहराला शिक्षण आरोग्य विषयक सोयींसाठी अवघ्या विदर्भात नावलौकीक प्राप्त आहे. याच पार्श्वभूमीवर यावर्षी या शहरात राज्यस्तरीय महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या पुढाकाराने जिल्हा आणि तालुका कुस्तीगीर संघटनेच्या वतीने १० ते १२ डिसेंबर या कालावधीत करण्यात आले आहे.
वडेट्टीवार यांच्या वाढदिवसानिमित्त १०, ११ आणि १२ डिसेंबर २०२३ रोजी २५ वी वरिष्ठ महिला तसेच ६ वी सब ज्युनियर राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा तसेच २ री महिला महाराष्ट्र केसरी किताब लढत स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ह्या स्पर्धेत संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतून जवळपास ६०० महिला कुस्तीगीर या स्पर्धेसाठी येणार असून भव्यदिव्य स्वरुपात ह्या स्पर्धेचे आयोजन ब्रम्हपुरी शहरातील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज क्रीडांगणात करण्यात येणार आहे.
या स्पर्धेचे प्रायोजक विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे असणार आहेत.स्पर्धेचे उद्घाटन १० डिसेंबर रोजी सायंकाळी सायंकाळी ६ वाजता होणार असून सदर महिला केसरी कुस्ती स्पर्धेच्या कार्यक्रमा प्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून राज्याचे विरोधी पक्ष नेते तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार, तर प्रमुख अतिथी म्हणून पदवीधर मतदार संघ नागपूरचे आमदार अभिजीत वंजारी, शिक्षक मतदार संघाचे आमदार सुधाकर अडबाले , महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार, नगराध्यक्ष रीता उराडे उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमावली
१० डिसेंबर रोजी दुपारी ३ ते ५ या वेळात शहरातील मुख्य रस्त्यावरून रॅली, सायंकाळी ५ वाजता कुस्ती स्पर्धेला प्रारंभ, सायंकाळी ६ वाजता उद्घाटन समारंभ होईल.
११ डिसेंबर रोजी सकाळी ७.३० वाजता पासून कुस्तीला सुरुवात
१२ डिसेंबर रोजी सकाळी ७.३० वाजता कुस्ती स्पर्धेला प्रारंभ, सायंकाळी ७ वाजता बक्षीस वितरण समारंभ संपन्न होईल.
Women’s Maharashtra Kesari wrestling battle to be played in Bramhapuri
ML/KA/PGB
9 Dec 2023