देवगड समुद्रात पाच विद्यार्थी बुडाले

 देवगड समुद्रात पाच विद्यार्थी बुडाले

सिंधुदुर्ग, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :जिल्ह्यात देवगड येथील समुद्रकिनारी पोहण्यास उतरलेले पुणे येथील खासगी सैनिक अकॅडमीचे पाच विद्यार्थी बुडाले आहेत. त्यात चार मुली आणि एका मुलाचा समावेश आहे. त्यापैकी चौघा मुलींचे मृतदेह सापडले असून एक विद्यार्थी बेपत्ता आहे.
दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

पिंपरी चिंचवड येथील सैनिक अकॅडमीची ३५ जणांची सहल देवगड येथे आली होती. ते समुद्रात आंघोळीसाठी उतरले असता. पाच जण बुडू लागले. त्यावेळी आकाश तुपे त्यांना वाचविण्यास गेला. मात्र तोपर्यंत ते पाचजण खोल पाण्यात गेले. चार मुलींचे मृतदेह सापडले असून एक बेपत्ता आहे. सर्व मृतदेह ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले आहेत. मृतांमध्ये प्रेरणा डोंगरे, अंकिता गालटे, अनिशा पडवळ, पायल बनसोडे यांचा समावेश आहे. तर राम डिचोलकर बेपत्ता आहे. Five students drowned in Devgad sea

ML/KA/PGB
9 Dec 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *