सरकारकडून काय करावी आशा तरुणांच्या माथी मारली ड्रगची नशा

 सरकारकडून काय करावी आशा तरुणांच्या माथी मारली ड्रगची नशा

नागपूर, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :नागपुरातील हिवाळी अधिवेशनाच्या आठव्या दिवशी विधिमंडळ परिसरात विरोधक ड्रगमाफिया ललित पाटील प्रकरणी आक्रमक झाले. विरोधी पक्षाच्या आमदारांनी आंदोलन करत ‘सरकारकडून काय करावी आशा, तरुणांच्या माथी मारली ड्रगची नशा’ म्हणत सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने केली.

याप्रसंगी विरोधकांनी पायऱ्यांवर ड्रग्जने तरुणाई उध्वस्त करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, तरुणाईला नशेच्या खाईत लोटणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, ड्रग्ज माफियांवर कारवाई न करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो अशा घोषणा देत सरकार विरोधात निदर्शने केली.

नागपूर येथे विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर जोरदार निदर्शने केले. ‘रुग्णालयाचे डीन आहेत की ड्रग डीलर, सबका कातील ललित पाटील, ससून रुग्णालयाचे डीन डॉ. संजीव ठाकूर यांना अटक करा, उडता पंजाब नंतर उडता महाराष्ट्र, सरकारकडून काय करावी आशा, तरुणांच्या माथी मारली ड्रगची नशा अशा विविध घोषणा लिहिलेले फलक घेत जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले. What should be done by the government Asha drug addiction hit the youth

ML/KA/PGB
18 Dec 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *