लॉजिस्टिक इझ ॲक्रॉस डिफरंट स्टेट (LEADS) 2023″ अहवालाचे प्रकाशन

 लॉजिस्टिक इझ ॲक्रॉस डिफरंट स्टेट (LEADS) 2023″ अहवालाचे प्रकाशन

नवी दिल्ली, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण तसेच वस्त्रोद्योग मंत्री पियुष गोयल यांनी आज येथे “लॉजिस्टिक्स इझ ॲक्रॉस डिफरंट स्टेट (LEADS) 2023” अहवाल प्रसिद्ध केला. भारताला 2047 पर्यंत 3.5 ट्रिलियन अमेरिकन डॉलर्स वरून 35 ट्रिलियन अमेरिकन डॉलर्स पर्यंत म्हणजेच 10 पट वाढीकडे नेण्याच्या आमच्या प्रयत्नात लॉजिस्टिक क्षेत्र एक महत्त्वाचा आधारस्तंभ असेल, असे गोयल यांनी सांगितले.

हा अहवाल प्रधानमंत्री गतिशक्तीवरील पायाभूत सुविधांचे नियोजन, लॉजिस्टिकला ‘उद्योगाचा दर्जा प्रदान करणे, मल्टीमॉडल संपर्क सुविधा, लॉजिस्टिक्समधील डिजिटल उपक्रम, शहर लॉजिस्टिक योजना, मल्टीमॉडल लॉजिस्टिक पार्क इत्यादीसारख्या उल्लेखनीय उपक्रमांना अधोरेखित करतो, असेही ते म्हणाले. राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी कौशल्य विकासावर भर देणे, क्षमता वाढवणे आणि लॉजिस्टिक धोरणांचे औपचारिकीकरण करणे, देखरेख व्यवस्थेची अंमलबजावणी आणि हरित लॉजिस्टिकला प्रोत्साहन देणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.

लॉजिस्टिक्स इझ ॲक्रॉस डिफरंट स्टेट अहवाल, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना लॉजिस्टिक क्षेत्रात अधिकाधिक क्रांतिकारी सुधारणा करण्यासाठी अभिनव सूचना देत आहे, आणि सोबतच आपल्याला विकसित भारताच्या दृष्टिकोनाच्या मार्गावर अग्रेसर करत आहे, असे गोयल यांनी यावेळी बोलताना सांगितले. हा अहवाल धोरणात्मक अंतर्दृष्टी प्रदान करून लॉजिस्टिक क्षेत्रातील भागधारकांसाठी मार्गदर्शक म्हणून काम करतो, असेही ते म्हणाले. लॉजिस्टिक कामगिरी वृद्धिंगत व्हावी म्हणून राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये निरोगी स्पर्धा निर्माण करण्यात हा अहवाल महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

SL/KA/SL

16 Dec. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *