‘फॉरएव्हर पार्टिकल्स’ प्रदूषण म्हणजे काय?

 ‘फॉरएव्हर पार्टिकल्स’ प्रदूषण म्हणजे काय?

मुंबई, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पॉलिफ्लोरोअल्किल अर्थात पीएफएएस हा रसायनांचा एक समूह आहे. १९४० पासून जगभरात त्याचा वापर केला जात आहे. पीएफएएस म्हणजे कार्बन आणि फ्लोरिनयुक्त संयुगाची मजबूत साखळी आहे, या साखळीला एखादा रासायनिक गट जोडलेला असतो. या घटकाचे वातावरणात सहजासहजी विघटन होत नाही. त्यामुळेच त्यांना ‘फॉरएव्हर पार्टिकल’ म्हटले जाते. त्यामुळे पर्यावरणाच्या दृष्टीने ती चिंतानजक बाब आहे. जगात सुमारे १४ हजार पीएफएएस घटक आढळतात. या घटकाचा वापर शेतातील खते व रसायने, खाद्यपदार्थ पॅकेजिंग, वस्त्रनिर्मिती, रसायने, रंगनिर्मिती, इलेक्ट्रॅनिक्स, बांधकाम अशा उद्योगांमध्ये केला जातो. मात्र आता हवा, पाणी आणि मातीमध्येही हा घटक पसरलेला आहे. अन्न, हवा, पाणी यांच्या माध्यमातून मनुष्याच्या किंवा प्राण्यांच्या रक्तात हा घटक आढळू लागला असून त्याचा पर्यावरणासह मानवी आरोग्यावर परिणाम होत आहे.

ML/ML/PGB
17 Apr 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *