भांडवली बाजाराचे (Stock Market) नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्या पतधोरणाचे स्वागत.

 भांडवली बाजाराचे (Stock Market) नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्या पतधोरणाचे स्वागत.

मुंबई, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जितेश सावंत

गेल्या आठवड्याची सुरुवात दमदार झाली. पहिल्या दिवशी चर्चा होती ती एचडीएफसी बँक आणि एचडीएफसी यांच्या विलीनीकरणाची या बातमीमुळे शेअर बाजार २ टक्क्यांहून अधिक वधारला. परंतु बाजाराचे लक्ष तिमाही निकाल आणि आरबीआयच्या बैठकीकडे होते. एचडीएफसी बँक आणि एचडीएफसी या समभागात या आठवड्यात चांगलीच नफावसुली झाली व बाजार घसरण्याचे ते एक प्रमुख कारण ठरले. दुसरीकडे उत्तर कोरियाच्या किम जोनच्या बहिणीने किम यो जोंग ने साऊथ कोरियाला आण्विक शस्त्रांचा (nuclear weapons) वापर करण्याची दिलेली धमकी, कोरोनाची सुरुवात झाल्यानंतर प्रथमच चीनमध्ये दररोज हजारोंच्या संख्येने वाढत असलेले रुग्ण,कमकुवत जागतिक संकेत,अमेरिकेमधील FOMC मिटींगचा तपशील,रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची बैठक, कमकुवत तिमाही निकालांच्या अपेक्षेने आयटी समभागांवर आलेला दबाव यामुळे गेल्या आठवड्यात बाजारात अस्थिरता वाढली व सलग तीन दिवस बाजारात नफावसुली दिसून आली.आरबीआयने नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्या पतधोरणात महत्त्वाचे व्याजदर स्थिर ठेवल्याने शेवटच्या दिवशी बाजार स्थिरावला.

आरबीआयने रशिया व युक्रेन मधील युद्धामुळे महागाईत वाढ होण्याची चिंता व्यक्त केली. तसेच FY 23 वर्षाकरिता GDP च्या अंदाजात ७.८ %वरून ७.२% अशी घट केली.

गुंतवणूकदारांचे लक्ष पुढील आठवड्यापासून सुरू होणाऱ्या चौथ्या तिमाहीच्या निकालाकडे राहील बँकिंग( banking) आणि आय.टी (IT) क्षेत्राच्या कंपनांच्या निकालांनी चौथ्या तिमाहीची सुरुवात होईल. सोमवारी TCS चे निकाल जाहीर होतील व बुधवारी Infosys आपले निकाल जाहीर करेल. गुरुवारी १४ एप्रिल रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त बाजार बंद राहतील याच दिवशी घाऊक महागाई दराचे (wpi inflation)आकडे जाहीर होतील. १५ एप्रिल रोजी बाजार गुड फ्रायडे निमित्त बंद राहतील त्याच दिवशी भारतीय हवामान विभाग (IMD) या वर्षीचा पावसाचा अंदाज जाहीर करेल.

एचडीएफसी-एचडीएफसी बँकेच्या विलीनीकरणाच्या योजनेला बाजाराची सलामी. Market cheers HDFC-HDFC Bank merger plan

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी बाजारात तुफान तेजी पसरली. एचडीएफसी बँक आणि एचडीएफसी यांच्या विलीनीकरणाच्या घोषणेनंतर, भारतीय शेअर बाजार २ टक्क्यांहून अधिक वधारला. विशेष म्हणजे या विलीनीकरणामुळे येणाऱ्या काळात मार्केट कॅपच्या बाबतीत ही देशातील तिसरी सर्वात मोठी कंपनी ठरली.विलीनीकरणाच्या बातमीमुळे आज देशांतर्गत बाजारात खास करून बँकिंग क्षेत्रात जोरदार तेजी पाहायला मिळाली.दिवसभराच्या कामकाजात सेन्सेक्सने ६०,८४५.१० व निफ्टीने १८,११४.६५ ची पातळी गाठली. बाजाराचे लक्ष तिमाही निकाल आणि आरबीआयच्या बैठकीकडे लागले आहे. दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स १३३५ अंकांनी वधारून ६०,६११ वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टीने ३८२ अंकांनी वाढ घेऊन १८,०५३ चा बंददिला.

सेन्सेक्समध्ये ४३५ अंकांची घसरण.Sensex falls 435 points

सोमवारच्या मजबूत रॅलीनंतर, ५ एप्रिल रोजी म्हणजेच मंगळवारी बाजारात नफा-वसुली दिसून आली. विशेषत: एचडीएफसी twins या विक्रीचा सर्वाधिक बळी ठरले. तर दुसरीकडे ऑटो, पॉवर आणि एफएमसीजीमध्ये खरेदी दिसून आली.बाजाराची सुरुवात चांगली झाली परंतु नफावसुलीमुळे सेन्सेक्स ५०० अनेकांनी घसरला. त्यातच उत्तर कोरियाच्या किम जोनच्या बहिणीने किम यो जोंग ने साऊथ कोरियाला आण्विक शस्त्रांचा (nuclear weapons) वापर करण्याची धमकी दिली. कोरोनाची सुरुवात झाल्यानंतर प्रथमच चीनमध्ये दररोज १६,४०० नवीन कोरोनाव्हायरस प्रकरणे नोंदवली जात असल्याची माहिती समोर आल्याने बाजरावर दबाव आला. दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स ४३५ अंकांनी घसरून ६०,१७६ वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टीत ९६ अंकांची घसरण होऊन १७,९५७ चा बंददिला.

बाजारात नफावसुली सेन्सेक्स ५६६ अंकांनी घसरला

बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी बाजारात नफावसुली दिसून आली.एचडीएफसी समूहाच्या समभागात झालेली घसरण आणि कमकुवत तिमाही निकालांच्या अपेक्षेने आयटी समभागांवर आलेला दबाव यामुळे मंदीचे वातावरण दिसून आले. याशिवाय कमकुवत जागतिक संकेतांचाही बाजारावर परिणाम दिसून आला.गुंतवणूकदारांची नजर अमेरिकेमधील FOMC च्या मार्च महिन्याच्या मिटींगच्या तपशीलाकडे लागली होती. चीन मध्ये एकाच दिवशी कोरोनाच्या २०,००० नवीन केसेस आल्याने बाजारावरील दबाव वाढला. दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स ५६६ अंकांनी घसरून ५९,६१० वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टीत १४९ अंकांची घसरण होऊन १७,८०७ चा बंददिला.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या पॉलिसी अगोदर निफ्टी 17,700 च्या खाली. Nifty below 17,700 ahead of RBI policy

गुरुवारी सलग तिसऱ्या दिवशी बाजारात नफावसुली दिसून आली.फार्मा वगळता जवळपास सर्वच क्षेत्रातील विक्रीमुळे सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये सुमारे १ टक्क्यांची घसरण झाली. आरबीआय धोरणाच्या एक दिवस आधी बाजारात अस्थिरता वाढताना दिसली.कमकुवत जागतिक संकेतांमुळे निराशाजनक सुरुवातीनंतर, दुपारच्या सत्रात बाजाराने थोडी रिकव्हरी पाहिली. परंतु रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या धोरण बैठकीच्या एक दिवस बाजार घसरणीनेच बंद झाला. दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स ५७५ अंकांनी घसरून ५९,०३४ वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टीत १६८ अंकांची घसरण होऊन १७,६३९ चा बंददिला.

बाजाराची आरबीआय पॉलिसीला सलामी. Market cheers RBI policy

सलग तीन दिवसांच्या मंदीचा सिलसिला शुक्रवारी बाजाराने तोडला.गुंतवणूकदारानी भारतीय रिझर्व्ह बँकेच्या २०२२-२३ च्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या पतधोरणात महत्त्वाचे व्याजदर स्थिर ठेवण्याच्या निर्णयाचे स्वागत केले.गेले दोन-तीन दिवस बाजार आरबीआयच्या बैठकीपूर्वी सावध होता परंतु बाजाराच्या अपेक्षेशी सुसंगत असलेल्या उपाययोजनांमुळे बाजार स्थिरावला.RBI च्या चलनविषयक धोरण समितीने (MPC) रेपो आणि रिव्हर्स रेपो रेट यामध्ये कुठलाही बदल न करता अनुक्रमे ४टक्के आणि ३.३५ टक्के हाच ठेवला. दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स ४१२ अंकांनी वधारून ५९,४४७ वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टीने १४४ अंकांनी वाढ घेऊन १७,७८४ चा बंददिला.Welcome to the first credit policy of the new financial year of the stock market.

(लेखक शेअर बाजार तज्ञ, तसेच Technical and Fundamental Analyst आहेत.)

jiteshsawant33@gmail.com

ML/KA/PGB

9 Apr 2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *