सोयाबीन पिकावर चक्रीभुंगा, आणि इतर किडीचा प्रादुर्भाव

बुलडाणा, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :बुलढाणा जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून वातावरणामध्ये वारंवार बदल होत आहेत आणि त्यामुळे सध्या सोयाबीन पिकावर चक्रीभुंगा सह इतर किडीचा प्रादुर्भाव वाढत आहे, वातावरणातील बदल किडींना पोषक असल्याने प्रादुर्भाव वाढला आहे, किडींपासून पिकांचे रक्षण करण्याकरिता शेतकरी मोठ्या प्रमाणावर कीटकनाशकांची फवारणी करताना दिसत आहेत. Weevil, and other insect infestations on soybean crop
यामध्ये उत्पादन खर्चात मोठ्या प्रमाणात वाढ होत असून, फवारणी करताना बनावट औषधांपासून शेतकऱ्यांनी आपली फसवणूक टाळावी, त्याचबरोबर कीटकनाशक फवारणी करताना खबरदारी घ्यावी, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे..
ML/ML/PGB
1 Aug 2024