जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करण्यासंदर्भात मार्ग
मुंबई, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राज्यातील राज्य सरकारी आणि निमसरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करण्याबद्दल चर्चेच्या माध्यमातून व्यवहार्य मार्ग काढण्यासाठी राज्य सरकार पुढाकार घेईल असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानपरिषदेत स्पष्ट केलं.Way to implement old pension plans
यासंदर्भात नियम ९७ अन्वये शिक्षक सदस्य कपिल पाटील यांनी उपस्थित केलेल्या अल्पकालीन चर्चेला ते उत्तर देत होते. यासंदर्भात कर्मचारी संघटनांची भूमिका समजून घेण्याची पूर्ण तयारी आहे ,यासंदर्भात घाईघाईने निर्णय न घेता मोठ्या प्रमाणात चर्चा घडवून आणली पाहिजे असं फडणवीस म्हणाले.
यासाठी कर्मचारी संघटनांनी या संपावर जाऊ नये ,या मुद्द्याचा केवळ भावनिक विचार न करता तांत्रिक आणि व्यवहार्य मार्गाने उपाय सुचवावेत , सरकारची ऐकून घेण्याची तयारी आहे तसंच विरोधी पक्षांनीही हा अहंकाराचा मुद्दा करू नये असं आवाहन फडणवीस यांनी यावेळी केलं.
ML/KA/PGB
10 Mar. 2023