राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा

 राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा

मुंबई, दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : उष्णतेच्या झळांनी होरपळणाऱ्या महाराष्ट्रातील काही जिल्ह्यामध्ये पूर्व मोसमी पावसाच्या सरींनी गारवा आणला आहे. पाऊस मुक्काम पुढचे दोन दिवस महाराष्ट्रात असण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पुणे, सातारा, नाशिक, अहमदनगर, कोल्हापूर, सोलापूर या मुसळधार पावसाची जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यात अनेक भागांमध्ये आज पाऊस पडत आहे. पुणे जिल्ह्यासाठी आज हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला होता. तर पुढच्या दोन दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे पुढच्या दोन दिवसांमध्ये पुण्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. पुण्यात 11 आणि 12 मे या दोन दिवशी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर 13 आणि 14 तारखेसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

सातारा जिल्ह्यात 12 मे या तारखेसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच नांदेड, लातूर, चंद्रपूर, यवतमाळ या जिल्ह्यांसाठी देखील 12 तारेखासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, गारपीट आणि सोसाट्याचा वारा पाऊस पडण्याची शक्यता आहे. वाऱ्याचा वेग हा 40 ते 50 किमी प्रतितास असण्याची शक्यता आहे.

सांगलीच्या वाळवा तालुक्यातील काही भागांना आज वादळी वारा आणि गारपिटासह पावसाने झोडपले आहे. सांगलीच्या वाळवा तालुक्यात विजांचा कडकडाट, वादळासह 20 मिनिटे गारांचा अवकाळी पाऊस झाला. गारपिटीमुळे या परिसरातील आंब्याचे भाजीपाला पिकाचे नुकसान झाले. या परिसरातील विहिरी कुपनलिका यांनी तळ गाठला होता. आज झालेल्या अवकाळी पावसामुळे हवेत गारवा आल्याने नागरिर सुखावले आहेत.

बुलढाणा जिल्ह्यात आज एकदा अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावल आहे, सतत दुसऱ्या दिवशी वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस पडत आहे. अचानक आलेल्या अवकाळी पावसाने येथील बाजार समितीमधील शेतकऱ्यांचा शेतमाल भिजला आहे. धान्याची झाकाझाक करत असताना शेतकऱ्यांची एकच तारांबळ उडाली आहे. मेहकर, चिखली, बुलढाणासह इतर तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या रब्बी पिकांचे नुकसान झाले आहे.

SL/ML/SL

10 May 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *