महाराष्ट्राच्या १५ व्या विधानसभेसाठी उद्या मतदान

 महाराष्ट्राच्या १५ व्या विधानसभेसाठी उद्या मतदान

मुंबई, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्र विधानसभेच्या प्रचाराची रणधुमाळी आता थंडावली असून आता उमेदवार आणि मतदार यांना उद्याच्या दिवसाचे वेध लागले आहेत. उद्या (दि. २०) राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघात ४ हजार १४० उमेदवारांमध्ये अटीतटीची लढत होणार आहे. राज्यभरात एकूण १००१८६ मतदान केंद्रे, २४१ सहाय्यक मतदान केंद्रे, ९९० क्रिटीकल मतदान केंद्रे उभारण्यात आली असून याद्वारे उद्या ४१३६ उमेदवारांचे राजकीय भविष्य पणाला लागणार आहे. मतदान प्रक्रियेसाठी निवडणूक आयोगाकडून १.२८ ५३१ VVPAT मशीन उपलब्ध करून देण्यात आली आहेत.राज्यातील १००४२७ मतदान केंद्रांपैकी ६७, ५५७ मतदान केंद्रांवर वेबकास्टींग प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.

मतदार संख्या
पुरुष – ५, ००२२,७३९
महिला – ४, ६९, ९६, २७९
तृतीयपंथीय – ६, १०१
एकूण – ९, ७०, २५, ११९

दिव्यांग मतदार
पुरुष – ३, ८४, ०६९
महिला – २, ५७, ३१७
तृतीयपंथील – ३९

एकूण – ६, ४१, ४२५

सेना दलातील मतदार
पुरुष – १, १२, ३१८
महिला – ३, ८५२
एकूण १,१६, १७०

SL/ML/SL

19 Nov. 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *