भांडवली बाजारात (Stock Market) प्रचंड अस्थिरता.जागतिक बाजारातील घसरणीचा भारतीय स्टॉक मार्केटवर प्रभाव. 

  भांडवली बाजारात (Stock Market) प्रचंड अस्थिरता.जागतिक बाजारातील घसरणीचा भारतीय स्टॉक मार्केटवर प्रभाव. 

मुंबई, दि. 31 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : या आठवडयात बाजारात खूप अस्थिरता होती.  बाजारावर वाढती महागाई ,खराब जागतिक संकेत खास करून चीन ,जपान व हाँग काँगच्या बाजारातील घसरण,आयएमएफने (IMF) भारताच्या वित्तीय वर्ष २२च्या आर्थिक वाढीचा कमी वर्तविलेला अंदाज,जुलै महिन्याची एक्स्पायरी,यूएस फेडच्या(U.S.Fed) पॉलिसीची बैठक, तिमाही निकाल या सगळ्याचा प्रभाव राहिला. येणाऱ्या काळात गुंतवणूकदारांनी सावधानता बाळगावी व खालच्या स्तरावर दीर्घकाळाकरीताच गुंतवणूक करावी. There was a lot of volatility in the market this week.

 

दिवसभरातील चढउतारानंतर बाजार बंद होताना निफ्टी १५,८०० च्या खाली. Markets end lower in the volatile trade with Nifty below 15,850

जागतिक बाजारातील कमजोरीचा फटका भारतीय बाजाराला बसला.आठवडयाच्या पहिल्याच दिवशी भारतीय बाजार उघडताच खाली घसरला.बाजारात खालच्या स्तरावर खरेदीचा जोर वाढला त्यामुळे बाजार थोडासा सुधारला,दिवसभरात बाजारात चढउतार जास्त प्रमाणात होता परंतु बंद होताना बाजार लाल होता.चीन व हाँगकाँगच्या शेअर्सनी या वर्षीचा नीचांक गाठला.चीन मधील एज्युकेशन,टेक,आणि प्रॉपर्टी क्षेत्रातील नवीन नियमांचा फटका तेथील बाजाराला बसला(Chinese education, property, and tech sector fell sharply after tighter government regulations).भारतीय बाजारात बँकिंग,ऑटो,एफएमसीजी या क्षेत्रात दबाव होता तर आय.टी,मेटल,फार्मा या क्षेत्रात खरेदी झाली. बाजार बंद होताना  सेन्सेक्स १२३ अंकांनी घसरून ५२,८५२ या स्तरावर बंद झाला व निफ्टी ३१अंकांनी  घसरून १५,८२४ चा बंद दिला. Sensex, Nifty Close Marginally Lower As Investors Digest Earnings.

बाजारातील अस्थिरतेमुळे बाजार जवळपास अर्ध्या टक्क्यांनी घसरले. फार्मा क्षेत्रात जोरदार विक्री. Markets traded volatile for yet another session and lost nearly half a percent.

मंगळवारी बाजाराची सुरुवात समाधानकारक झाली परंतु बाजारातील तेजी फार काळ टिकली नाही. चीनमधील समस्यांमुळे बाजारात मोठ्या प्रमाणात घसरण झाली  आशियाई बाजार 7-महिन्यांच्या खालच्या पातळीवर आले. बुधवारी आशियाई बाजारात सलग तिसऱ्या दिवशी जोरदार घसरण दिसून आली. चीनच्या इंटरनेट कंपन्यांमध्ये प्रचंड दबाव दिसूनआला.  याशिवाय यूएस फेडच्या(U.S.Fed) पॉलिसीच्या बैठकीपूर्वी बाँड आणि चलन बाजारावर प्रचंड दबाव होता. जपानबाहेरील आशिया पॅसिफिकच्या शेअर्ससाठी असलेल्या  एमएसपीआय निर्देशांकात  डिसेंबरच्या मध्यापासून 0.25 टक्क्यांनी घसरण झाली . त्याचाही  परिणाम भारतीय बाजारात दिसून आला.सेन्सेक्स-निफ्टी मध्ये  जबरदस्त दबाव होता. खराब जागतिक संकेतांनी बाजाराचा मूड खराब केला. धातू(metals) आणि ग्राहक टिकाऊ वस्तूचे(consumer durables) शेअर्स वगळता बाकीच्या क्षेत्रातील शेअर्स घसरले. धातूच्या समभागात चांगली खरेदी झाली. मेटल इंडेक्स 10 आठवड्यांच्या उच्चांकावर बंद झाला. सर्वात जास्त विक्री फार्मा आणि पॉवर समभागात दिसून आली. ऑटो, तेल-गॅस, रिअल इस्टेट  समभागांवरही दबाव होता.परंतु चहा आणि कॉफीशी संबंधित शेअर्समध्ये चांगली खरेदी दिसून आली.बाजार बंद होताना  सेन्सेक्स २७३ अंकांनी घसरून ५२,५८० या स्तरावर बंद झाला व निफ्टी ७८ अंकांनी  घसरून १५,७५० चा बंद दिला.निफ्टी बँकेत १५२ अंकांची घसरण झाली. Sensex, Nifty Decline As Dr. Reddy’s Triggers Selloff In Pharma Shares.

बाजारात प्रचंड घसरण अवघ्या तीन सत्रांत मार्केट कॅपचे 1लाख कोटी रुपयांहून अधिक नुकसान झाले. Over Rs 1 lakh crore in market cap lost in just 3 sessions 

जागतिक बाजारातील कमजोर संकेताचा फटका बुधवारी भारतीय बाजराला चांगलाच बसला बाजाराची सुरुवात कमजोरीने झाली. टेक समभागांच्या घसरणीमुळे अमेरिकी बाजार मंगळवारी कमकुवत झाले होते.जपानचा निर्देशांक निक्केई अर्ध्या टक्क्यांहून अधिक खाली होता, हाँगकाँग चे बाजार दोन दिवसाच्या घसरणीनंतर सावरण्यासाठी धडपडत होते. चिनी टेक कंपन्यांच्या शेअर्समध्ये जोरदार विक्री सुरू होती. चिनी सरकार इतर क्षेत्रातील कंपन्यांविरूद्ध कठोर कारवाई करण्याची शक्यता वर्तवली जात होती. या सगळ्याचा परिणाम भारतीय बाजारावर साफ दिसत होता.निफ्टी उघडताच १५,७०० च्या खाली घसरला. सेन्सेक्समध्ये ७०० अंकाहून अधिक घसरण झाली. आयएमएफने (IMF) भारताच्या वित्तीय वर्ष 22 च्या आर्थिक वाढीचा अंदाज कमी केल्याने गुंतवणूकदारांच्या चिंतेत वाढ झाली. दुपारनंतर बाजार हळूहळू सावरला. अवघ्या तीन सत्रांत मार्केट कॅपचे 1 लाख कोटी रुपयांहून अधिक नुकसान झाले. बाजारात टेलिकॉम(Telecom), धातू(Metal), मूलभूत वस्तू तसेच भांडवली वस्तूंच्या(capital goods) शेअर्स मध्ये खरेदी दिसून आली तर ऑटो, बँका,आणि रिअल इस्टेट या क्षेत्रात विक्री झाली. बाजार बंद होताना  सेन्सेक्स १३५ अंकांनी घसरून ५२,४४३  या स्तरावर बंद झाला व निफ्टी ३७ अंकांनी  घसरून १५,७०९ चा बंद दिला.

सलग तीन दिवसांनंतर बाजार तेजीत निफ्टीने पार केला १५,७०० चा टप्पा. Market broke the three-day losing streak and end higher with Nifty above 15,750  

गुरुवारी जागतिक बाजारात संमिश्र व्यवहार चालू होते. भारतीय बाजाराची सुरुवात मजबुतीने झाली. बुधवारी अमेरिकत FED ने व्याजदर बदलले नाही. दर शून्य ते 0.25 टक्क्यांच्या दरम्यान असतील व -कोरोना संकट असूनही अर्थव्यवस्थेतील परिस्थिती सुधारली आहे असे फेडरल रिझर्व्हने सांगितले. भारतीय बाजार एक्स्पायरीच्या दिवशी तेजीत होते. धातू,(metals),रिअल इस्टेट(realty), सार्वजनिक क्षेत्र(public sector) आणि आयटी(IT) समभागांमध्ये खरेदी दिसून आली, तर एफएमसीजी(FMCG), दूरसंचार(telecom), वीज(Power) आणि तेल(Oil) आणि वायू(Gas) या क्षेत्रात विक्रीचा दबाव दिसून आला. बाजार बंद होताना  सेन्सेक्स २०९अंकांनी वधारून  ५२,६५३  या स्तरावर बंद झाला व निफ्टी ६९अंकांनी वधारून  १५,७७८चा बंद दिला. Sensex, Nifty Snap 3-Day Losing Streak As Metals Extend Rally.

ऑगस्टच्या F&O मालिकेच्या पहिल्या दिवशी अस्थिरतेमुळे बाजार सपाट बंद. Market ends flat on first day of August series amid volatility.

ऑगस्टच्या F&O मालिकेच्या पहिल्या दिवशी बाजारात अस्थिरता होती. आशियाई बाजार पण कमजोर होता.फार्मा आणि ऑटो सेक्टरमुळे बाजार तरला.दरम्यान नजर बंद होताना लाल चिन्हात बंद झालानिफ्टी फार्मा निर्देशांक  3.6 टक्के वाढला. वाहन निर्देशांक सुमारे 1 टक्क्यांनी वाढला. पण  धातू आणि वित्तीय समभागांमध्ये विक्री दिसून आली. सन फार्मा, टेक महिंद्रा, सिप्ला, श्री सिमेंट्स आणि अदानी पोर्ट्स  निफ्टीमध्ये अव्वल ठरले. तर हिंडाल्को, बजाज फायनान्स, एसबीआय लाइफ इन्शुरन्स, बजाज फिनसर्व्ह आणि एसबीआय घसरले. बाजार बंद होताना  सेन्सेक्स ६६.२३अंकांनी घसरून  ५२,५८६ या स्तरावर बंद झाला व निफ्टी १५.५०अंकांनी घसरून १५,७५३ चा बंद दिला. Sensex, Nifty Log Second Weekly Decline, But End July Higher.

जितेश सावंत

शेअर बाजार तज्ञ,

Technical and Fundamental Analyst-Stock Market

jiteshsawant33@gmail.com  

JS/KA/PGB
31 July 2021

mmc

Related post