फेड आणि रिझर्व्ह बँकेकडून दर कपातीची आशा कमी झाल्याने बाजारात अस्थिरता

 फेड आणि रिझर्व्ह बँकेकडून दर कपातीची आशा कमी झाल्याने बाजारात अस्थिरता

मुंबई, दि. 11 (जितेश सावंत) : अर्थसंकल्पीय आठवड्यात नवीन उच्चांक गाठल्यानंतर, 9 फेब्रुवारी रोजी संपलेल्या आठवड्यात मोठ्या अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर बाजार रेंजबाउंड कारभार करताना दिसला.यूएस फेड आणि रिझर्व्ह बँकेकडून केलेल्या कमेंट नंतर लवकर दर कपातीची आशा कमी झाल्याने बाजार एका विशिष्ठ पातळीभोवती फिरत राहिला.

येणाऱ्या आठवड्यात गुंतवणूकदारांचे लक्ष प्रामुख्याने कंपन्यांच्या Q3 निकालांचा शेवटचा आठवडा (येत्या आठवड्यात 1000 हून अधिक कंपन्या त्यांचे Q3 FY24 निकाल जाहीर करतील),12 फेब्रुवारी रोजी जाहीर होणारे CPI(कंझुमर्स फूड प्राईस इंडेक्स) आकडे,13 फेब्रुवारी रोजी जाहीर होणारा यूएस चलनवाढीचा डेटा (U.S. inflation data), तेलाच्या किमती (Oil Prices) तसेच विदेशी गुंतवणूकदारांची भूमिका (FII flows) या कडे राहील.

Technical view on nifty-. शुक्रवारी निफ्टीने 21782 चा बंद भाव दिला. निफ्टी साठी 21740.80-21697-21640-21598-21576.05 हे महत्वाचे सपोर्ट(Support) आहेत हे तोडल्यास निफ्टी 21547-21517-21500 21477-21448-21434-21365-21329-21285 हे स्तर गाठेल. तर वरच्या स्तरावर निफ्टी साठी 21797.30-21812-21962.05-22018.55-22126-22183.30-22239.80 हे रेसिस्टन्स (Resistance) ठरतील.

सेन्सेक्स 354 अंकांनी घसरला

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सकारात्मक जागतिक संकेत असल्याने बाजाराची सुरुवात चांगली झाली परंतू सुरुवातीचा नफा टिकवण्यात बाजार अयशस्वी ठरला.
गुंतवणूकदारांचे लक्ष आरबीआय च्या बैठकीकडे लागले असल्याने बाजारात अस्थिरता वाढली,शेवटच्या तासात झालेल्या शार्प फॉल मुळे सेन्सक्स 450अंकांपेक्षा जास्त घसरला.दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स 354.21 अंकांनी घसरून 71,731.42 वर बंद झाला.दुसरीकडे निफ्टीत 82.10 अंकांची घट होऊन निफ्टीने 21,771.70 चा बंद दिला. Sensex down 354 points

सेन्सेक्स 450 अंकांनी वधारला

आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी जागतिक बाजारात संमिश्र संकेत असून देखील भारतीय बाजार उच्च पातळीवर उघडले आणि दिवसभर ही तेजी टिकवण्यात यशस्वी झाले तसेच बंद होताना दिवसाच्या उच्चतम पातळीजवळ बंद झाले.यूएस फेडरल रिझर्व्हच्या दर कपात करण्यास विलंबा संबंधित चिंते कडे गुंतवणूकदार दुर्लक्ष करताना दिसले.आयटी शेअर्समधील खरेदीमुळे निर्देशांकात जोरदार वाढ झाली. Sensex up 450 points

बाजाराचा सपाट बंद

बुधवारच्या अत्यंत अस्थिर अश्या सत्रात बाजाराची,
निफ्टीची 22,000 चा टप्पा ओलांडून सुरवात होऊन देखील बाजार सपाट बंद झाला.8 फेब्रुवारी रोजी जाहीर होणाऱ्या भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण निर्णयाकडे गुंतवणूकदारांचे लक्ष केंद्रित झाल्याने गुंतवणूकदारांनी वरच्या स्तरावर नफावसुलीला प्राधान्य दिले. एका पोलनुसार, RBI 8 फेब्रुवारी रोजी प्रमुख व्याजदर जैसे थे ठेवण्याची शक्यता असल्याचे दिसून आले. Benchmarks end flat

आरबीआयने (RBI ) व्याजदरात कोणताही बदल न केल्याने सेन्सेक्स, निफ्टीत मोठी घसरण

गुरुवारी सकारात्मक सुरुवातीनंतर बाजारात मोठ्या प्रमाणात घसरण झाली. आरबीआयच्या पतधोरणाच्या घोषणेनंतर,रेपो दरात कोणताही बदल न केल्याने खाजगी बँकांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. दिवसभरात सेन्सेक्स 900 अंकांनी गडगडला. त्याचप्रमाणे निर्देशांकातील हेवीवेट शेअर असलेल्या आयटीसी मधील मोठ्या घसरणीचा फटका बाजाराला बसला.बाजार बंद होताना सेन्सेक्स 723.57 अंकाने कोसळून 71,428.43 वर बंद झाला. RBI policy, selling in ITC drag Sensex 724 pts.

सेन्सेक्स 167 अंकांनी वधारला

आठवड्याच्या शेवटच्या दिवशी अस्थिर अश्या सत्रात बाजाराने सकारात्मक बंद दिला. बँक शेअर्सच्या खरेदीमुळे बाजार वधारले.मागील सत्रातील सत्रातील घसरणीनंतर बँकिंग क्षेत्राला गुंतवणूकदारांनी प्राधान्य दिले. परंतु पुढील आठवड्यात यूएस, यूके आणि भारतीय महागाईची आकडेवारी जाहीर होण्यापूर्वी बाजाराने सावधगिरीचा पवित्र बाळगला होता.Sensex up 167 points Volatility in markets as hopes of rate cuts from the Fed and Reserve Bank fade

(लेखक शेअरबाजार तसेच सायबर कायदा तज्ञ,आहेत)

jiteshsawant33@gmail.com

ML/KA/PGB
11 Feb 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *