गुढीपाडव्यानिमित्त पंढरपूरचे विठ्ठल मंदिर फुलांनी सजले

सोलापूर, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क): साडेतीन मुहूर्ता पैकी एक मुहूर्त असणाऱ्या गुढीपाडव्यानिमित्त पंढरपूरचे विठ्ठल मंदिर हे फुलांनी सजले आहे. 450 किलो शेवंती, 40 किलो गुलाबी कनेर, 40 किलो अष्टर, 100 किलो झेंडू, 500 नग गुलाबाच्या वापरापासून संपूर्ण विठ्ठल मंदिर हे पाडव्यानिमित्त सजवण्यात आले आहे.Vitthal Temple of Pandharpur was decorated with flowers on the occasion of Gudi Padwa
मराठी नववर्षाच्या प्रारंभी अनेक भाविक पंढरपुरात दर्शनासाठी येत असतात. या पार्श्वभूमीवर मंदिर समितीला रांजणगाव, पुणे येथील भाविक नानासाहेब दिनकरराव पाचनकर यांनी फुलांची सजावट विठ्ठल चरणी अर्पण केली. फुलांच्या या नयनरम्य सजावटीमुळे विठ्ठलाचे रूप अधिक लोभसवाणे दिसत होते. गुढीपाडव्यानिमित्त विठ्ठलास साखरेचा हार परिधान करण्यात आला. तर पहाटेपासूनच मंदिरात भाविकांनी विठ्ठल दर्शनासाठी गर्दी केली.
ML/KA/PGB
22 Mar. 2023