अयोध्या कार्यक्रमासाठी विठ्ठल मंदिराला विद्युत रोषणाईचा साज..

सोलापूर, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :आयोध्या येथील श्रीराम मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त पंढरपूरचे विठ्ठल मंदिर हे विद्युत रोषणाईने उजळून निघाले आहे. मंदिरावर असणाऱ्या विठ्ठल रुक्मिणी मातेच्या शिखरासह संपूर्ण मंदिर महाद्वार, नामदेव पायरी, गोपूर आणि तुकाराम भवन या ठिकाणी आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. त्यामुळे पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराचे रूप सध्या खुलून दिसत आहे. विशेष म्हणजे आषाढी यात्रेप्रमाणे विठ्ठल मंदिराला रोषणाईचा साज चढवल्याने सध्या पंढरीचे विठ्ठल मंदिर भाविकांसह नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे. Vitthal temple is decorated with electric lights for Ayodhya program..
ML/KA/PGB
21 Jan 2024