ज्येष्ठ पत्रकार अजय वैद्य यांना जीवनगौरव तर किशोर आपटे यांना पत्रकारिता पुरस्कार जाहीर

 ज्येष्ठ पत्रकार अजय वैद्य यांना जीवनगौरव तर किशोर आपटे यांना पत्रकारिता पुरस्कार जाहीर

मुंबई, दि. 06 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या वतीने देण्यात येणा-या विविध पुरस्कारांची घोषणा आज करण्यात आली, मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे माजी अध्यक्ष अजय वैद्य यांना यंदाचा कृ.पा.सामक जीवनगौरब पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. तर किशोर आपटे यांना उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्कारांची घोषणा मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष मंदार पारकर आणि कार्यवाह प्रमोद डोईफोडे यांनी केली.

पत्रकारिता क्षेत्रात राज्यस्तरावर उल्लेखनीय कामगिरी करणा-या पत्रकारांना मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या वतीने विविध पुरस्काराने गौरविण्यात येते. मराठी पत्रकार दिनाचे औचित्य साधून सन २०२२ च्या विविध पुरस्कारांची घोषणा आज करण्यात आली. यंदाचा कृ.पां.सामक राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कार मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे माजी अध्यक्ष अजय वैद्य यांना जाहीर करण्यात आला आहे. याशिवाय राज्यस्तरीय वृत्तप्रतिनिधींसाठी देण्यात येणारा राज्यस्तरीय उत्कृष्ठ पत्रकारीता पुरस्कार गडचिरोलीचे पुण्यनगरी दैनिकाचे जिल्हा प्रतिनिधी अविनाश भांडेकर यांना जाहीर करण्यात आला आहे.Veteran Journalist Ajay Vaidya was awarded Lifetime Achievement Award and Journalism Award was announced to Kishore Apte

राज्यस्तरीय इलेक्ट्रॉनिक माध्यम प्रतिनिधीसांठी देण्यात येणारा राज्यस्तरीय उत्कृष्ठ पत्रकारीता पुरस्कार साम वृत्तवाहिनीच्या ब्युरो चीफ रश्मी पुराणिक यांना जाहीर करण्यात आला आहे. तर संघ सदस्यांसाठी असणारा राज्यस्तरीय उत्कृष्ठ पत्रकारीता पुरस्कार दै. पुण्यनगरीचे विशेष प्रतिनिधी किशोर आपटे यांना जाहीर करण्यात आला. आहे. पुरस्कार निवड समितीचे प्रमुख म्हणून किरण नाईक, अनिकेत जोशी यांनी तर सदस्य सचिव म्हणून मिलिंद लिमये यांनी काम पाहिले.

ML/KA/PGB
06 Jan. 2023

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *