ज्येष्ठ क्रिकेट समीक्षक द्वारकानाथ संझगिरी यांचे निधन

 ज्येष्ठ क्रिकेट समीक्षक द्वारकानाथ संझगिरी यांचे निधन

मुंबई, दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : खुमासदार निवेदन आणि लेखनशैलीसाठी प्रसिद्ध असलेले प्रख्यात समीक्षक द्वारकानाथ संझगिरी (७४) यांचं आज मुंबईतील लीलावती रुग्णालयात निधन झाल. द्वारकानाथ संझगिरी यांच्या निधनानंतर सोशल मीडियावर अनेक क्रिकेट चाहत्यांकडून त्यांच्या आठवणींना उजाळा दिला जात आहे. यांच्या पार्थिवावर उद्या दुपारी 12 वाजता दादरमधील शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

द्वारकानाथ संझगिरी यांनी क्रिकेट आणि सिनेमा या विषयांवर अनेक पुस्तकं लिहिली होती.’ क्रिकेट कॉकटेल’, ‘क्रिकेटर्स मनातले’, अश्रू आणि षटकार, अफलातून अवलिये, फिल्मी कट्टा या आणि अशा अनेक पुस्तकांचं लेखन द्वारकानाथ संझगिरी यांनी केलं होतं. संझगिरी फेसबूकवर सातत्याने क्रिकेट आणि सिनेमा या विषयांवर विस्तृत आणि माहितीपूर्ण लिहायचे. त्यांच्या या लेखाचा एक वाचक आणि चाहतावर्ग होता. मात्र आता त्यांच्या निधनामुळे क्रिकेट आणि सिनेचाहत्यांना या अशा माहितीपूर्ण लेखाला मुकावं लागणार आहे.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *