रामदेव बाबांविरोधात न्यायालयाकडून अजामीनपात्र वॉरंट

तिरुअनंतपुरम, दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पतंजलीच्या उत्पादनांच्या फसव्या जाहिराती प्रसिद्ध केल्याप्रकरणी योगगुरु बाबा रामदेव पुन्हा अडचणीत आले आहेत. केरळच्या पलकड्ड प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने त्यांच्याविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले आहे.यासंदर्भात केरळच्या औषध निरीक्षकांनी बाबा रामदेव, आचार्य बालकृष्ण, पतंजली आयुर्वेद आणि दिव्य फार्मसीविरोधात ड्रग्ज अँड मॅजिक रेमेडीज (आक्षेपार्ह जाहिराती) कायदा, १९५४ मधील तरतुदीनुसार तक्रार दाखल केली होती.
आजारावर रामबाण उपाय असा दावा करणाऱ्या या जाहिरातींमुळे कायद्याच्या कलम ३ चे उल्लंघन आहे,असा दावा तक्रारीमध्ये करण्यात आला होता.या प्रकरणीच्या खटल्यात न्यायालयाने बाबा रामदेव यांना १ फेब्रुवारी रोजी सुनावणीसाठी हजर राहण्याचे जामीनपात्र वॉरंट बजावले होते.मात्र १ फेब्रुवारी रोजी बाबा रामदेव आणि आचार्य बालकृष्ण सुनावणीसाठी हजर राहिले नाहीत. त्यामुळे न्यायालयाने त्यांच्याविरोधात १५ फेब्रुवारी रोजी सुनावणीसाठी हजर राहण्याचे अजामीनपात्र वॉरंट बजावले आहे.
SL/ML/SL
6 Feb. 2025