मराठवाड्यासाठी लवकरच धावणार वंदे भारत एक्सप्रेस

 मराठवाड्यासाठी लवकरच धावणार वंदे भारत एक्सप्रेस

मुंबई, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वेगवान आणि आरामदायक सेवेमुळे देशवासियांच्या पसंतीस उतरलेली वंदे भारत एक्सप्रेस आता मराठवाड्यासाठीही धावणार आहे. सध्या महाराष्ट्रातून पाच वंदे भारत एक्सप्रेस धावतात. आता महाराष्ट्राला लवकरच सहावी वंदे भारत मिळणार आहे. मध्य रेल्वेला वंदे भारतचे रॅक मिळाले असून मुंबई ते जालना दरम्यान ही रेल्वे धावणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या रेल्वेला ३० डिसेंबर रोजी हिरवा झेंडा दाखवणार आहे. वंदे भारत रेल्वे अयोध्या-आनंद विहार, नवी दिल्ली-वैष्णवो देवी, अमृतसर-नवी दिल्ली, जालना-मुंबई आणि कोइंबतूर-बंगळूरु येत्या ३० तारखेपासून धावणार आहे. तसेच पूल-पूश तंत्रज्ञान असलेली अमृत भारत नावाच्या दोन रेल्वे देशात प्रथमच धावणार आहेत.

महाराष्ट्रात सध्या सुरु असलेल्या वंदे भारत

  • मुंबई ते गांधीनगर
  • मुंबई ते सोलापूर,
  • मुंबई ते साईनगर शिर्डी
  • मुंबई ते गोवा
  • नागपूर ते बिलासपूर

त्याचबरोबर आता श्रमिक कामगारांना लक्षात घेऊन अमृत भारत रेल्वे ही गाडी सुरु झाली आहे. अमृत भारत रेल्वे नवी दिल्ली ते दरभंगा दरम्यान धावणार आहे. तसेत दुसरी गाडी मालदा-बंगळूरु दरम्यान चालवण्यात येणार आहे. या रेल्वे उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, ओडिशा, आंध्र प्रदेश, तेलंगणा, दिल्ली, पंजाब, गुजरात, महाराष्ट्र या राज्यातून सुरु करण्यात येणार आहे. अमृत भारत ट्रेनचा तिकीट दर सामान्य रेल्वे पेक्षा 10-15 टक्के अधिक असणार आहे.

SL/KA/SL

22 Dec. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *