ही तर वज्र झूठ सभा…
ठाणे , दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मविआची आजची सभा म्हणजे वज्रमुठ सभा नसून सत्तेसाठी हपापलेल्या खोट्या लोकांची वज्रझूठ सभा आहे अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. आज ठाण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री बोलत होते. येत्या ९ एप्रिल रोजी शिवसेनेच्या सर्व आमदार – खासदारां सह आपण अयोध्या दौर्यावर जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. ठाण्यातील आनंद आश्रम येथे रविवारी पार पडलेल्या पत्रकार परिषदेला अभिनेते शरद पोंक्षे,राज्य समन्वयक नरेश म्हस्के उपस्थित होते.यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने पक्ष पुढे नेत असताना काही घटना अशा घडल्या त्या आम्ही आणि सर्वांनी अनुभवल्या आहेत असे म्हटले.शिवधनुष्य पेलण्याकरता तेवढे मोठे मन आणि विचार लागतात,कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे काम त्यावेळी बाळासाहेबांनी केले. पण आता हे सर्व कालबाह्य झाले.आता फक्त स्वतःपुरता विचार करून मी आणि माझा परीवार अशा विचाराने लोकं काम करत आहेत. अशी टीका मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरेंचे नाव न घेता केली. अयोध्येला आम्ही ९ एप्रिल ला जाणार आहोत, हा आमच्यासाठी भावनेचा, आस्थेचा विषय आहे . बाकीच्यांचे मी काही बोलू शकत नाही. खारीचा वाटा म्हणून जशी धर्मवीर आनंद दिघे यांनी चांदीची वीट पाठवली तशी आम्ही आता महाराष्ट्रातून सागाची लाकडे पाठवली आहेत असे ते म्हणाले.ज्या संभाजीनगरच्या नामकरणाला विरोध करीत होते त्याच संभाजीनगर मध्ये ही सभा होतेय हे दुर्दैवी आहे. सांप्रदायिक दंगे मतांच्या राजकारणासाठी काही लोक करीत आहेत. ते कारस्थान हाणून पाडले जाईल, गृहविभाग याकडे लक्ष ठेवून आहे, कायदा सुव्यवस्था राखणे सर्वाचीच जबाबदारी आहे असे मुख्यमंत्री म्हणाले. जनतेच्या मनातील सरकार स्थापन करत असताना लोकांच्या मनातील कामं करत असताना आम्हाला शिवजयंतीच्या पुर्व संध्येला आम्ही धनुष्यबाण मिळाले आधी काही आमदारांना विमानातून उतरावं लागल्याने रामाचे दर्शन झाले नव्हते. भव्य राम मंदीर उभारले गेले पाहिजे हे स्वप्न बाळासाहेबांचे होते ते पंतप्रधानांनी पुर्ण केलय अयोध्येबाबत आम्ही कधीही राजकारण केले नाही असं मुख्यमंत्री म्हणाले.
ML/KA/PGB 2 APR 2023