‘वास्तुशास्त्र’ एक पुरातन शास्त्र
मुंबई, दि. 21 (जितेश सावंत): ज्या वेळी ब्रहमदेवाने सुर्ष्टीची निर्मिती केली त्यावेळी प्रथम पंचतत्त्व निर्माण केली त्यानंतर पर्वत,समुद्र,वृक्ष,निर्माण केले त्याचप्रमाणे उत्पत्ती व विनाश होणारे अनेक पदार्थ निर्माण केले. त्यानंतर मानवाची निर्मिती झाली व मानव निसर्गातील एक महत्वाचा घटक झाला. निसर्गातील घडामोडींचा मानवी जीवनावर कळत नकळत परिणाम होत असतो.
सूर्य मालिकेतील प्रमुख ग्रह सूर्य व त्याभोवती भ्रमण करणारे इतर ग्रह व उपग्रह यांच्या पासून उत्पन्न होणाऱ्या किरणांचा देखील मानवी शरीरातील जीवरासायनिक क्रियांवर निश्चितच परिणाम होत असतो. ही सृष्टी पृथ्वी,आप,तेज,वायू,आणि आकाश या पंचमहाभूतांनी बनलेली आहे. मानवाचे शरीर देखील याच पंचमहाभूतांनी बनलेले आहे.
या पाच तत्वानुसार निसर्ग व मानवी देह यात योग्य प्रमाणात संधान जुळून आल्यास मनुष्याचे जीवन सुखी व समृद्ध होऊ शकते. पण हा समतोल राहिला नाही तर जीवनात अडथळे येऊ लागतात.
वास्तुशास्त्र हे ५००० वर्षांपेक्षाही पुरातन शास्त्र आहे. भृगऋषी, अत्रिऋषी, वसीष्ठ ऋषी, विश्वकर्मा, मय, शौनक हे त्या युगातील वास्तुशास्त्राचे महान अभ्यासक आणि जनक होते. या महान ऋषींनी ग्रंथ लिहून ठेवले आहेत. तसेच अठरा पुराणांपैकी नऊ पुराणे, मानस, विश्वकर्माप्रकाश, बृहत्संहिता, वास्तुरत्नावली, मयमत हे ग्रंथ वास्तुशास्त्राचे आद्यग्रंथ आहेत.
महाभारतात देखील या शास्त्राचे अनेक दाखले आढळतात. भगवान श्री कृष्णांनी या विश्वातील पहिला अभियंता विश्वकर्मा यास द्वारका नागरी वसवण्यास सांगितले त्यावेळी त्याने द्वारका नगरीतील घरे,देवालये,वाडे, तसेच इतर सर्व गोष्टी वास्तुशास्त्राचे नियम पाळून केल्या. व श्रीकृष्णांच्या सांगण्यावरून हि नगरी पाण्याच्या मध्यभागी वसवली आणि कालांतराने ती जलमय होईल याची रचना केली, ही नगरी कालांतराने पाण्याखाली गेली.
हजारो वर्षानंतर आज आधुनिक काळात देखील या शास्त्राचा योग्य प्रकारे वापर करून आपले जीवन समृद्ध करण्याचा मानवाचा कल दिसत आहे. या शास्त्रानुसार सूर्याकडून मिळणारी ऊर्जा हि फार महत्वाची आहे या ऊर्जेतून दोन महत्वाची किरणे आपणास मिळतात (ultraviolet/infrared) सूर्याच्या किरणात एकूण सात रंग असतात. ‘ता ना पी ही नि पा जा’. यातील ताबंड्या रंगात infrared हि किरणे मोठ्या प्रमाणात असतात. व जांभळ्या रंगात ultraviolet किरणे जास्त प्रमाणात असतात. या सात किरणांचा जमिनीवर व वस्तूवर निरनिराळा परिणाम दिसून येतो.
या शास्त्राप्रमाणे जर आपले जीवन सुखकर करावयाचे असेल तर या शास्त्राचे नियम पाळणे आवश्यक आहे. वास्तूची जमीन कशी असावी (जमिनीची निवड), मातीचे प्रकार /रंग, पाया खणण्यास कुठून सुरुवात करावी, प्रवेशद्वार कोठे असावे त्याची लांबी,रुंदी,उंची काय असावी. खिडक्या कोणत्या बाजूस असाव्यात, किती असाव्यात, जिना कोठे असावा ,देवघर,स्वयंपाकघर,अभ्यासाची खोली,शयनकक्ष,कोणत्या दिशेस असावे,दिशेप्रमाणे कोठे झोपावे,तिजोरी तसेच धान्यसंचयाची दिशा, शौचालय कोठे व कोणत्या दिशेस असावे या सगळ्या गोष्टींचा सारासार विचार करून वास्तू बांधल्यास त्याचे लाभ अधिक मिळतात.
असे केल्याने आनंद, कौटुंबिक सुख, संततीची प्रगती, मानसिक स्वास्थ, उत्कर्ष, नोकरी व व्यवसायात यश, आर्थिक लाभ, पती/पत्नीतील सुसंवाद ,तसेच वास्तू मधून सकारात्मक ऊर्जा मिळते. घरातले वातावरण हस्ते खेळते राहावे म्हणून या शास्त्राचा वापर आपण आपल्या वास्तूत करणे आवश्यक आहे. सध्याच्या वाढत्या शहरीकरणात(फ्लॅट संस्कृती) आपल्याला मनासारखी वास्तू मिळणे कठीण असते तसेच बऱ्याच वेळेला या शास्त्राची माहिती देखील नसते म्हणून बऱ्याच जणांना वास्तुदोषाला सामोरे जावे लागते व अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.खास करून ब्रह्मस्थानातील दोष, ब्रह्मस्थानाला वास्तुशास्त्रात फार महत्त्व आहे. वास्तूचा मध्यबिंदू म्हणजे ब्रह्मस्थान. वास्तुशास्त्रानुसार ब्रह्मस्थान नेहमी मोकळे असायला पाहिजे. कोणतेही दालन, भिंत, खांब शौचालय, खड्डा, स्नानघर, जड वस्तू तिथे ठेवलेली नसावी.
परंतु उपाय करून वास्तुदोषांवर बऱ्याच प्रमाणात मात करता येते.जसे की रत्नाध्याय, मेटल थेरपी,पिरॅमिड थेरपी ,रंग थेरपी,वास्तू सभोवतीची वृक्ष रचना,वास्तू मालकाची कुंडली व वास्तू यांचा संबंध/तुलना यामुळे वास्तूत सकारत्मक ऊर्जा निर्माण होऊन वास्तूचे लाभ मिळतात.’Vaastu Shastra’ an ancient science
जितेश सावंत
के. पी. विशारद ,नक्षत्र सम्राट, वास्तू तज्ञ (Astro Vastu Consultant)
jiteshsawant33@gmail.com
ML/KA/PGB
21 Dec .2022