कापडी पिशव्या वापरा, पर्यावरणारची वारी, निघाली पंढरीच्या दारी !

मुंबई, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आषाढी पालखी सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित ‘पर्यावरणाची वारी, पंढरीच्या दारी’ हा एक उत्कृष्ट उपक्रम असून, याच्या माध्यमातून समाजात पर्यावरणाविषयी जागरुकता निर्माण होईल, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव डॉ.अविनाश ढाकणे यांनी केले. एकल वापराच्या प्लास्टिकचा वापर पूर्णपणे बंद करावा आणि खरेदीला जाताना नेहमी कापडी पिशवी सोबत ठेवण्याचा सर्वांनी संकल्प करावा, असे आवाहनही केले.
या उपक्रमात राज्य शासनाने घेतलेल्या एकल वापराचे प्लास्टिक बंदी बाबत व्यापक जनजागृती, प्लास्टिकचा वापर टाळणे आणि कापडी पिशव्यांचा जास्तीत जास्त वापर करणे, विजेची बचत, पाण्याचा अतिरिक्त वापर टाळून पाण्याचे नियोजन, वृक्षतोड टाळणे आणि बांबू लागवडीबाबत संदेश देण्यात येणार आहे.
Use cloth bags, be environmentally friendly, leave the doors of Pandhari!
ML/ML/PGB
30 Jun 2024