पावसामुळे दीडशे एकर वरील ऊस जमीनदोस्त
वाशिम, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वाशिमच्या रिसोड तालुक्यातील महागाव परिसरात काल झालेल्या जोरदार पावसामुळं ऊस शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून या परिसरातील शेतकरी यादव हुंबाड यांच्या शेतातील तीन एकर पैकी दोन एकर ऊस जमीनदोस्त झाला तर गावातील एकूण दीडशे एकर पेक्षा जास्त ऊस शेतीचं याच प्रकारे नुकसान झालंय, या नुकसानीचे करण्यासाठी शासकीय कर्मचारी पोहचले नसल्यानं शेतकऱ्यांनी नाराजी बोलून दाखवली. या नुकसानीचे पंचनामे करून आर्थिक मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे.
ML/ML/PGB 24 Aug 2024