UPI चा विक्रम, पार केला १०० अब्ज व्यवहारांचा टप्पा

 UPI चा विक्रम, पार केला १०० अब्ज व्यवहारांचा टप्पा

मुंबई, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : UPI द्वारे आर्थिक व्यवहार हा आता सर्वसामान्य नागरिकांच्या नेहमीच्या आयुष्याचा भाग झाला आहे. झटपट ट्रॅन्सॅक्शन्स, कमीतकमी रक्कम देवघेव करण्याची सुविधा यामुळे खरेदीसाठी जाताना रोकड सोबत घेऊन जाण्याची जोखीम संपली आहे. त्यामुळे अगदी भाजीवाल्यापासून ते सोनाराच्या दुकानांपर्यंत सर्वत्र UPI द्वारे आर्थिक व्यवहार करण्याला प्राधान्य दिले जात आहे. डिसेंबर २०२३ मध्ये UPI व्यवहारांमध्ये विक्रमी वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे. या एका महिन्यात १८.२३ लाख कोटी रुपयांचे व्यवहार झालेत. हे २०२२ च्या याच महिन्याच्या तुलनेत सुमारे ५४ टक्के अधिक आहेत. तसेच २०२३ मध्ये एकूण UPI व्यवहारांची संख्या १०० अब्जांपेक्षा जास्त आहे. त्यांच्यामार्फत १८२ लाख कोटी रुपयांचे व्यवहार झालेत. २०२२च्या तुलनेत ४४ टक्के वाढ झाली आहे.

नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) च्या गेल्या वर्षीच्या आकडेवारीनुसार, UPI व्यवहार ४४ टक्क्यांनी वाढून सुमारे ११८ अब्ज झाले आहेत. एकट्या डिसेंबरमध्ये १२.०२ अब्ज व्यवहार झालेत, जे डिसेंबर २०२२च्या तुलनेत ४२ टक्के अधिक आहेत. UPI व्यवहारांमध्ये नोव्हेंबरमध्ये १७.४० लाख कोटी रुपये आणि ऑक्टोबरमध्ये १७.१६ लाख कोटी रुपयांचे व्यवहार झालेत. नोव्हेंबरमध्ये एकूण UPI व्यवहार ११.२४ अब्ज आणि ऑक्टोबरमध्ये ११.४१ अब्ज होते.

NPCI च्या मते, २०२२ मध्ये ७४ अब्ज UPI व्यवहार झाले होते, तर २०२३ मध्ये हा आकडा ६० टक्क्यांनी वाढून ११८ अब्ज व्यवहार झाले. ऑगस्ट २०२३ मध्ये UPI ने प्रथमच १० अब्ज व्यवहारांचा आकडा पार केला. यानंतर त्यात सातत्याने वाढ होत आहे. २०२३ मध्ये UPI च्या माध्यमातून एकूण १८२ लाख कोटी रुपयांचे व्यवहार झालेत. २०२२ मध्ये UPI द्वारे १२६ लाख कोटी रुपयांचे पेमेंट करण्यात आले. UPI द्वारे आर्थिक व्यवहार करण्यास प्राधान्य देणे हे देशातील नागरिक अधिकाधीक तंत्रसाक्षर होऊ लागल्याचे द्योतक मानले जात आहे.

SL/KA/SL

3 Jan. 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *