अवकाळी पावसाचा पोलीस भरतीच्या उमेदवारांना फटका
मुंबई, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मुंबईत पडणाऱ्या अवकाळी पावसाचा फटका पोलीस भरतीसाठी आलेल्या उमेदवारांना बसला आहे.आज मंगळवार 21 मार्च रोजी मुंबईत होणारी पोलीस भरतीची मैदानी चाचणी आता पुढे ढकलण्यात आली आहे.
मुंबई पोलीस शिपाई भरती – 2021 मधील मैदानी चाचणी 6 फेब्रुवारी 23 पासून सुरु करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेतंर्गत 21 मार्च रोजी मैदानी चाचणी घेण्याबाबचा कार्यक्रम प्रसिध्द करण्यात आला.महा आय-टी कडून उमेदवारांना प्रवेश देखील देण्यात आली आहेत. मात्र मुंबई शहरामध्ये आज पहाटे पासून पाऊस सुरु झाला आहे.Unseasonal rains hit police recruitment candidates
मुंबईत पडणाऱ्या अवकाळी पावसामुळे आज मंगळवारी होणारी मैदानी चाचणी प्रक्रिया रदद करण्यात आली आहे .
ही मैदानी चाचणी नायगाव पोलीस मुख्यालय येथे 25 मार्च रोजी तर मरोळ आणि मुंबई विद्यापीठ मैदान कलिना येथे 27 मार्च रोजी संबंधित उमेदवारांना मैदानी चाचणीसाठी या मैदानामध्ये प्रवेश देण्यात येणार आहे ,असे पोलीस उपायुक्त
तेजस्वी सातपुते यांनी म्हटलं आहे.
ML/KA/PGB
21 Mar. 2023