अवकाळी पावसाचे थैमान, वीज पडून 4 जनावरे दगावली…

जालना, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :जालन्यातल्या भोकरदन – जाफ्राबाद तालुक्याला अवकाळी पावसाने पुन्हा झोडपून काढलंय. 5 दिवसांच्या विश्रांती नंतर भोकरदन जाफ्राबाद तालुक्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावलीय. विजांच्या कडकडाटासह झालेल्या या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची जनावरे दगावलीय. यात 2 गाई, 1 बैल आणि एका मशीचा समावेश असून वीज पडून या 4 जनावरांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे .
भोकरदन तालुक्यातील मौजे लतिफपूर येथील हरिदास मोरे यांची 1 गाय तर जाफ्राबाद तालुक्यातील बोरगाव शिवारात बांधलेली आनंद लोदवाल यांची गाय वीज पडून दगावलीय. तर जाफ्राबाद शहरातील शेतकरी सुरेश शिंदे यांचा एक बैल आणि टेंभुर्णी येथील शेतकरी विठोबा शिंदे यांची 1 म्हैस वीज पडल्याने मयत झालीय. त्यामुळे हे शेतकरी संकटात सापडले असून नुकसान भरपाई मिळण्याची मागणी त्यांनी केलीय.
unseasonal rains,
4 animals died due to lightning…
ML/ML/PGB
17 Apr 2024