फ्रान्समध्ये सापडली शिवरायांची अप्रकाशित बखर

 फ्रान्समध्ये सापडली शिवरायांची अप्रकाशित बखर

पॅरीस, दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : फ्रान्सच्या नॅशनल लायब्ररीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची बखर सापडली आहे. पुण्यातील संशोधक गुरुप्रसाद कानिटकर आणि मनोज दाणी यांना इतिहास संशोधनासाठी लागणारी काही जुनी कागदपत्रे तसेच पुस्तके चाळत असताना छत्रपती शिवाजी महाराजांची जुनी अप्रकाशित बखर सापडली आहे.फ्रान्समध्ये सापडलेली ही बखर १७४० नंतर लिहिलेली असून मोडी लिपीतील हस्तलिखित स्वरूपात आहे. या बखरीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची पूर्ण कारकीर्द आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या कारकिर्दीचा प्रारंभ नमूद करण्यात आलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाला कसे मारले? त्यावेळी कोण कोण लोक हजर होते? याचा तपशीलही या बखरीत आहे.

मूळ कोल्हापुरचे इतिहास संशोधक गुरुप्रसाद कानिटकर व सध्या अमेरिकेत नोकरीनिमित्त राहणारे मनोज दाणी हे दोघेही ६ महिन्यांपासून फ्रान्समधील राष्ट्रीय ग्रंथालयात जुनी हस्तलिखित कागदपत्रे पाहत होते. त्यावेळी या दोघांना मोडी लिपीतील काही कागदपत्रे दिसून आली. त्यांचा अभ्यास करत असताना त्यांना ही छत्रपती शिवरायांची जुनी अप्रकाशित बखर असल्याचे लक्षात आले. फ्रान्समध्ये सापडलेली ही बखर चिमाजी आप्पांच्या सिद्धीवरील स्वारीनंतर म्हणजेच अंदाजे १७४० नंतर लिहिली असावी असा अंदाज आहे. बखरीच्या शेवटी ही किताबत ‘राजश्री राघो मुकुंद’ यांची असे, असाही उल्लेख केलेला आहे.

ML/ML/SL

15 June 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *