न्यायाधीन ‘ या ‘ बंद्यांना स्वखर्चाने अंथरूण वापरण्याची मुभा
मुंबई दि.22 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राज्यातील कारागृहे ही सुधारगृहे व्हावीत, यासाठी कारागृह , सुधारसेवा विभागाचे अपर पोलीस महासंचालक तसेच महानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांनी प्रयत्न सुरू केले आहेत.
याचाच एक भाग म्हणून राज्यातील कारागृहांमध्ये 50 वर्ष व त्यापेक्षा जास्त वय असलेल्या बंद्यांना स्वखर्चाने जाड बेडिंग (अंथरुण) व उशी आणण्याची परवानी देण्यात आली आहे.
कारागृह विभागातील अडी-अडचणी जाणून घेवून त्या दूर करण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी कारागृह विभागाचे अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांच्या अध्यक्षेखाली आढावा बैठक घेण्यात आली. त्यामध्ये या प्रस्तावास मान्यता देण्यात आली आहे.
यासंदर्भात परवानगीबाबतचे परिपत्रक सर्व प्रादेशिक विभाग प्रमुख व सर्व कारागृह अधीक्षक यांना परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे. या बैठकीस कारागृह विभागाचे सर्व कारागृह उपमहानिरीक्षक व सर्व कारागृहांचे अधीक्षक उपस्थित होते.
राज्यातील कारागृहांमध्ये 50 वर्षे व त्यावरील वयाचे बंदी असून त्यात काही वयोवृद्ध बंदी आजारी असतात. अशा बाबींचा सारासार विचार करून वय 50 किंवा त्यापेक्षा जास्त वय असलेल्या सर्व न्यायाधीन बंद्यांना साधारणतः जाड बेडिंग (अंथरूण ) तसेच उशी स्वखर्चाने आणण्याची परवानगी देण्याच्या प्रस्तावावर यावेळी चर्चा झाली व त्याच्या प्रारूपास मान्यता देण्यात आली.
ML/KA/SL
22 Feb. 2023