बेळगाव, कारवार, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही : उद्धव ठाकरे

 बेळगाव, कारवार, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही : उद्धव ठाकरे

मुंबई, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : संयुक्त महाराष्ट्राचा लढा संपूर्ण देशाने पहिला आहे.अजूनही बेळगाव, कारवार, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झालेला नाही. तो घेतल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही.असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे udhav Thakrey  यांनी दिला.

कुणीही यायचं आणि डिवचून जायचं. आज सर्व पक्षांचे झेंडे इथे दिसतायत, ही महाराष्ट्राची ताकद आहे. फक्त महाराष्ट्रद्रोही इथे नाहीत. खुर्ची गेली तरी बेहत्तर, पण महाराष्ट्राच्या अस्मितेशी आम्ही तडजोड होऊ देणार नाही आणि असं जो कुणी करण्याचा प्रयत्न करेल, त्याला गुडघ्यावर खाली झुकवल्याशिवाय राहणार नाही ही शिवसेनाप्रमुखांची शिकवण आहे असे ठाकरे यांनी निक्षून सांगितले.

तिसरे आपले मुंबईचे पालकमंत्री आहेत. त्यांनी तर आग्र्याहून महाराजांची सुटका झाली, त्यांची बरोबरी या खोकेवाल्यांशी केली आहे. कुठे तुम्ही, कुठे शिवाजी महाराजांचा ज्वलंत इतिहास. आग्र्याहून सुटका झाल्यानंतर शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं. आणि यांनी खोके घेऊन, लांडीलबाडी करून, पाठीत वार करून, तेही आपल्या राजकीय पक्षाच्या म्हणजे स्वत:च्या आईच्या पाठीत नव्हे, कुशीत वार करून सरकार स्थापन केलं, त्यांची तुलना तुम्ही शिवाजी महाराजांशी करताय? या गर्दीमुळे महाराष्ट्रद्रोह्यांचे डोळे उघडले पाहिजेत. जर ते उघडणार नसतील, तर ते कधीच उघडू नयेत, अशी आपण प्रार्थना करुयात असे ठाकरे म्हणाले.

 

या मंत्रीमंडळात कसे मंत्री आहेत? एक तर बौद्धिक दारिद्र्य असणारे आहेत. दुसरे सुप्रिया सुळेंचा अपमान करणारे आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचा अधिकार या लफंग्यांना नाहीये. हे लफंगे आहेत. महाराष्ट्र लुटायला आले आहेत. शिवाजी महाराजांनी मातेबद्दल, परस्त्रीबद्दल आदर कसा ठेवायचा याची शिकवण दिली आहे .त्यांना महाराष्ट्रचे नाव घेण्याचा अधिकार नाही .असे ठाकरे म्हणाले.

छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुलेंबद्दल हे बोलतायत. जर ते नसते, तर आज आपण कुठे असतो त्याचं एक उदाहरण आपल्या मंत्र्यांनी ‘भीक’ शब्द वापरून दाखवून दिलं आहे. त्या लोकांनी तेव्हा शेणमार, धोंडमार सहन केली पण ते डगमगले नाही. त्यांच्यामुळे आपण शाळेत गेलो. आपण तसे गेलो नसतो, तर आपणही यांच्यासारखे मंत्री बनून अशी शाब्दिक भीक मागत बसलो असतो. हे वैचारिक दारिद्र्य आहे असे सांगून ते म्हणाले की, मी तर राज्यपालांना राज्यपालच मानत नाही. त्या पदाचा आम्ही नक्की मान राखतो. त्या पदावर कुणीही बसावं आणि कुणालाही टपल्या माराव्या हे आम्ही सहन करणार नाही. त्यामुळे राज्यपाल कोण असावा? फक्त केंद्रात जो बसतो, त्यांच्याघरी काम करणारा माणूस कुठेतरी सोय म्हणून पाठवायचा नसतो. राज्यपाल हे राष्ट्रपतींचे दूत असतात. त्यांनी त्यांच्यासारखं वागलं पाहिजे.आजच्या मोरच्यांची गर्दी बघून अशी

ताकद एकवटल्यानंतर कुणाची ताकद आहे मुंबई किंवा महाराष्ट्राचा लचका तोडायची ते बघतोच असे ठाकरे म्हणाले.

ML/KA/PGB

 

17 Dec 2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *