राष्ट्रवादी (शरद पवार ) चे दोन दिवसीय अधिवेशन शिर्डीत
अहमदनगर, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :देशात आगामी काळात होऊ घातलेल्या लोकसभा आणि विविध राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार ) वतीने शिर्डी येथे आजपासून दोन दिवसीय अधिवेशन तथा शिबिराचे उदघाटन पक्षाचे अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करुन करण्यात आले. उद्या सायंकाळी खा. पवार यांच्याच भाषणाने या शिबिराचा समारोप होईल.
आज सकाळी दहा वाजून दहा मिनिटांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. पवार यांच्या हस्ते तसेच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खा. सुप्रिया सुळे यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले. देशातील सध्याची राजकीय परिस्थिती लक्षात घेता आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीची दिशा ठरविण्यासाठी या शिबिरात चिंतन आणि मंथन करून पुढील वाटचालीची दिशा ठरविण्यात येणार आहे.
ज्योत निष्ठेची, लोकशाहीच्या रक्षणाची अशी टॅग लाईन या शिबिराला देण्यात आली आहे. या शिबिरात पक्षाचे राष्ट्रीय व प्रदेश पातळीवरील अनेक मान्यवर नेते मार्गदर्शन करणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर प्रथमच राष्ट्रवादी (शरद पवार ) पक्षाचे हे व्यापक शिबिर होत असल्याने याकडे राज्याचे, देशाचे लक्ष लागले आहे. पक्षाचे युवा नेते रोहित पवार आज अनुपस्थित राहिल्याने त्याची चर्चा झाली मात्र ते परदेशात असून उद्या उपस्थित राहतील असे सांगण्यात आले. Two day convention of NCP (Sharad Pawar) in Shirdi
ML/KA/PGB
3 Jan 2024