हळदीला मिळाला उच्चांकी दर..

 हळदीला मिळाला उच्चांकी दर..

सांगली, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सांगली मध्ये राजापूरी हळदीला तब्बल 32 हजार रुपये प्रतिक्विंटल इतका उच्चांकी दर मिळाला आहे.मिरज तालुक्यातील बेडग येथील शेतकरी अण्णासो ओमासे यांच्या हळदीला हंगामातील हा पहिला उच्चांकी दर मिळाला आहे. सांगलीच्या कृषी उत्पन्न बाजार समिती Sangli Agricultural Produce Market Committee  मध्ये पार पडलेल्या सौद्यामध्ये ओमासे यांच्या राजापुरी हळदीला हा दर मिळाला आहे.तर कमीत कमी नऊ हजार आणि सरासरी 14 हजार रुपये दर मिळाला आहे. जागतिक हळदीची बाजारपेठ म्हणून सांगलीची ओळख आहे.Turmeric gets high price .. गेल्या महिन्यापासून हळदीच्या सौद्यांना सुरवात झाली असून हळदीला अधिकचा दर मिळत आहे.

महाराष्ट्र,कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात शेतकरी आपली हळद घेऊन येत आहे.हळदीला चांगला दर मिळत असल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे.Turmeric gets high price ..

ML/KA/PGB

25 Feb 2022

 

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *