राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा जन्मोत्सव सोहळा…

अमरावती , दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क): खंजिरीच्या माध्यमातून देशभक्तीपर भजने गाऊन समाजाला सर्वधर्म समभावाची शिकवण देणाऱ्या राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा त्यांची जन्मभूमी असलेल्या अमरावती जिल्ह्यातील यावली शहीद या गावी मोठ्या उत्साहात पहाटे साडेपाच वाजता पार पडला.. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जन्मोत्सव सोहळ्याला हजारो गुरुदेव भक्तांनी उपस्थिती लावली होती.पहाटे चार वाजता पासुन तुकडोजी महाराजांच्या या जन्मोत्सव सोहळ्याला सुमधूर भजनाने सुरवात झाली. मागील सात दिवसापासून विविध उपक्रम राबविण्यात येवून यावली शहीद या गावी तुकडोजी महाराज यांच्या ग्रामजयंती महोत्सवाला प्रारंभ झाला होता.. गुरुदेव भक्तांनी मोठ्या प्रमाणावर या जन्मोत्सव कार्यक्रमाला हजेरी लावली.
ML/KA/PGB 30 APR 2023