तुकाराम गडाख यांचे निधन

 तुकाराम गडाख यांचे निधन

अहमदनगर, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क): अहमदनगर जिल्ह्यातील नेवासे तालुक्याचेअभ्यासू नेते असलेले माजी आमदार, माजी खासदार तुकाराम गडाख यांचं आकस्मिक निधन झालं. काल रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास त्यांना ह्रदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यांना अहमदनगरच्या रुग्णालयात तात्काळ उपचारार्थ हलविण्यात आलं होतंTukaram Gadakh passed away

याच दरम्यान, रात्री बारा ते साडेबाराच्या सुमारास त्यांनी इहलोकीचा निरोप घेतला. ते 72 वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर पानसवाडीच्या (ता. नेवासा) अमरधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. माजी खासदार स्व. तुकाराम गडाख यांच्या पश्चात पत्नी, त्यांचे बंधू किसन गडाख (पेशवे), पाच बहिणी, एक मुलगा, दोन मुली, नातवंडे असा परिवार आहे.

माजी खासदार तुकाराम गडाखांनी त्यांच्या राजकीय जीवनात कडवट असा संघर्ष केला. धर्मग्रंथांच्या अभ्यासाच्या जोरावर त्यांनी अध्यात्मिक तत्वज्ञानाचंही प्रबोधन केलं. सत्ताधार्‍यांना त्यांनी ‘पळता भुई थोडी’ केली.

तुकाराम पाटील गडाख हे नेवासेचे आमदार होते. अहमदनगर जिल्ह्यात विकास आघाडी स्थापन करून त्यांनी प्रस्थापितांच्या राजकारणाला सुरुंग लावला होता. अपक्ष आमदार ते राष्ट्रवादीचे खासदार म्हणून ते निवडून आले होते.

माजी खासदार तुकाराम पाटील गडाख यांचा धाडसी स्वभाव आणि कार्यकर्त्यांना संभाळण्याची मोठी ताकद त्यांच्यात असल्यामुळे जीवाभावाचे कार्यकर्ते त्यांच्याकडे होते. त्यामुळे राजकारणात तुकाराम गडाख यांचे नांव समोर आले की भल्या – भल्यांची बोलती बंद होत होती. त्यांना भाऊ या नावाने ओळखले जात होते. खासदार तुकाराम पाटील गडाख यांच्या निधनाने कार्यकर्त्यांना जीव लावणारा लढवय्या नेता हरपल्याची जनभावना निर्माण झाली आहे.Tukaram Gadakh passed away

ML/KA/PGB
3 Dec .2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *