श्री.क्षेत्र त्र्यंबकेश्वर मंदिर बंद
नाशिक, दि. 1 ( एमएमसी न्यूज नेटवर्क): बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर मंदिर हे अतिप्राचीन त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे संवर्धन करण्यासाठी व मंदिराच्या देखभालीच्या कारणासाठी दिनांक 5 जानेवारी ते 12 जानेवारी पर्यंत पूर्णपणे बंद राहणार आहे .
त्यामुळे नेहमीप्रमाणे श्री त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन भाविकांना घेता येणार नाही, सदरचे संवर्धन काम हे भारतीय पुरातत्त्व खात्यामार्फत करण्यात येणार आहे तरी सर्व भाविक हितचिंतकांनी याची नोंद घ्यावी आणि सहकार्य करावे असे आवाहन श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टचे चेअरमन आणि विश्वस्त मंडळाने केले आहे.
ML/KA/SL
1 Jan. 2023