स्टार बॅक कासवांची तस्करी
मुंबई दि.13, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क): दुर्मिळ स्टार बॅक कासवांची तस्करी करणाऱ्या एकाला एम एच बी पोलिसांनी बोरीवली मधून अटक केली. Trafficking in star-backed turtlesनदीम शुजाउद्दीन शेख (वय 33 ,रा,.मीरा रोड )असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्या कडून 20 स्टार बॅक कासव हस्तगत केले असून,त्याची किंमत साडेतीन लाख रुपये आहे. बोरीवलीच्या एमएचबी कॉलनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत स्टार बॅक प्रजातीचे दुर्मिळ कासव विक्रीसाठी येत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर कुडाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा रचून नदीम शेख यास बोरीवलीच्या गणपत पाटील नगर येथून ताब्यात घेतले. यावेळी त्याच्या कडे दुर्मिळ 20 स्टार बॅक कासव आढळून आले.ज्याची किंमत साडेतीन लाख रुपये आहे.पोलिसांनी ती कासवे जप्त केली आहे .या प्रकरणी पोलिसांनी वन्यजीव संरक्षण कायदा, 1972 च्या कलम 9, 39, 44, 48, 48, 51 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ML/KA/PGB
13 Dec .2022