#आयएसआय आणि खलिस्तानी संघटनांची शेतकऱ्यांच्या ‘ट्रॅक्टर रॅली’वर नजर, यंत्रणा सतर्क

 #आयएसआय आणि खलिस्तानी संघटनांची शेतकऱ्यांच्या ‘ट्रॅक्टर रॅली’वर नजर, यंत्रणा सतर्क

नवी दिल्ली, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दोन महिन्यांपासून कृषी कायद्याच्या विरोधात आंदोलन करणारे शेतकरी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने दिल्लीत शेतकरी ट्रॅक्टर रॅली काढत आहेत, ज्यामुळे सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे, परंतु बदनामी करण्याच्या कटाविषयी मिळालेल्या माहितीने गुप्तचर यंत्रणांची झोप उडाली आहे. पोलिसांच्या सूत्रांकडून समजले की आयएसआय आणि खलिस्तानी संघटना शेतकरी मेळाव्याला बदनाम करण्याचे षडयंत्र रचत आहेत.
या मेळाव्यात भिंडरवाला यांचे पोस्टर लावण्याचे षडयंत्र रचण्यात आल्याची गोपनीय माहिती मिळाली आहे. त्याचबरोबर संपूर्ण दिल्लीत वीजपुरवठा खंडित करण्याचेही इनपुट मिळाले आहेत, त्यानंतर सर्व विद्युत केंद्र आणि उपकेंद्रांची सुरक्षा वाढविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अशी माहिती मिळाल्यानंतर दिल्ली पोलिसांसह सर्व गुप्तचर यंत्रणा हाय अलर्टवर आहेत. शेतकरी संघटनांनाही सतर्क राहण्यास सांगितले आहे.
अशी माहिती आहे की खलिस्तानी संघटना शीख फॉर जस्टिसचे प्रवक्ते गुरपतवंत सिंह पन्नू यांनी व्हिडिओ मेसेज पाठवले आहेत, तर ट्रॅक्टरवर तिरंगा लावू नका असे सांगत फोनकॉलही येत आहेत. एनआयएने (राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा) गुरुपतवंत सिंह पन्नूविरोधात यूएपीए (बेकायदेशीर क्रियाकलाप (प्रतिबंध) कायदा 1967) अंतर्गत 15 डिसेंबर 2020 रोजी गुन्हा दाखल केला होता.
दिल्ली पोलिसांनी रविवारी असा दावा केला आहे की, शेतकरी मेळाव्यास अडथळा आणण्यासाठी पाकिस्तानकडून 300 हून अधिक ट्विटर अकाउंट तयार केली गेली आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘पाकिस्तानात 308 पाकिस्तानी ट्विटर हँडल्स देखील सापडले असल्याची पुष्टी झाली आहे. दहशतवादी रॅलीमध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. दरम्यान, शेतकरी संघटनांनीही शांततेत ट्रॅक्टर रॅली काढण्याचे आवाहन केले आहे.
Tag-ISI/Khalistani organizations look at/ ‘tractor rally’
HSR/KA/HSR/ 25 JANUARY 2021

mmc

Related post