उद्या लागणार डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणाचा निकाल

 उद्या लागणार डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणाचा निकाल

पुणे, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्या प्रकरणाचा गेल्या १० वर्षांपासून रखडलेला निकाल अखेर उद्या जाहीर होणार आहे. डॉ. दाभोलकर यांची पुण्यातील ओंकारेश्वर मंदिराजवळील मंदिराजवळील महर्षी शिंदे पुलावर २० ऑगस्ट २०१३ ला सकाळी पिस्तुलातून गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. ओंकारेश्वर मंदिराजवळील शिंदे पुलावर सकाळी सव्वासातच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांना थांबवले व अगदी जवळून पिस्तुलाच्या गोळ्या त्यांच्यावर झाडल्या होत्या. त्यात त्यांचा जागेवर मृत्यू झाला होता.

या गुन्ह्यातील आरोपी डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, सचिन अंदुरे, शरद कळसकर, संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे या पाच जणांवर १५ सप्टेंबर २०२१ ला आरोप निश्चित करण्यात आले. सुरुवातीला या खटल्याची सुनावणी वर्षभर जिल्हा न्यायाधीश एस. आर. नावंदर यांच्या न्यायालयात सुरु होती. त्यानंतर न्यायाधीश नावंदर यांची बदली झाल्याने सध्या पी. पी. जाधव यांच्या न्यायालयात या खटल्याची सुनावणी सुरु आहे. सीबीआयचे वकील प्रकाश सूर्यवंशी यांनी या प्रकरणात २० साक्षीदार तपासले.

तावडे, अंदुरे, कळसकर आणि भावे यांच्यावर भारतीय दंडसंहिता (आयपीत्ती) कलम ३०२ (हत्या), १२० (बी) (गुन्ह्याचा कट रचणे), ३४ नुसार आणि शस्त्र अधिनियम संबंधित कलमांतर्गत आणि यूएपीए अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले. तावडे, अंदुरे, कळसकर आणि भावे यांच्यावर भारतीय दंडसंहिता (आयपीत्ती) कलम ३०२ (हत्या), १२० (बी) (गुन्ह्याचा कट रचणे), ३४ नुसार आणि शस्त्र अधिनियम संबंधित कलमांतर्गत आणि यूएपीए अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यातील संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे हे दोन आरोपी सध्या जामिनावर बाहेर आहेत.

असा झाला उलगडा

बंगळूरमध्ये पत्रकार गौरी लंकेश यांच्या झालेल्या खुना प्रकरणी कर्नाटक एटीएसने चिंचवडहून अमोल काळे याला ताब्यात घेतले होते. त्याच्याकडून नालासोपारा येथील वैभव राऊत याचे धागेदोरे मिळाले. त्याच्या घरातून पोलिसांनी शस्त्रांचा आणि स्फोटकांचा साठा जप्त केला. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी शरद कळसकरला अटक केली. त्याने सचिन अंदुरेच्या मदतीने डॉ. दाभोलकरांची हत्या केल्याची कबुली दिली आहे.

ML/ML/SL

9 May 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *