‘महानंद’ जाणार गुजरातच्या ‘मदर डेअरी’च्या ताब्यात

 ‘महानंद’ जाणार गुजरातच्या ‘मदर डेअरी’च्या ताब्यात

मुंबई, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :

एकेकाळी उद्योग आणि सहकार क्षेत्रात अग्रेसर असलेल्या महाराष्ट्राला राजकीय अनागोंदी आणि निर्णय लकव्यामुळे ग्रहण लागले आहे. परिणामी राज्यात येऊ घातलेले अनेक प्रकल्प अन्य राज्यात, विशेषतः गुजरातकडे वळत आहे.
महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ म्हणजे महानंद या राज्यातील प्रसिद्ध डेअरीवर गुजरातच्या मदर डेअरीने (mother dairy) ताबा मिळवला आहे. महानंदच्या हस्तांतरणाची प्रक्रिया २ मे रोजीच पूर्ण झाली असून याचे वृत्त आजसमोर आले आहे. काही महिन्यांपासून महानंद डेअरी गुजरातच्या अमूल डेअरीकडे हस्तांतरित करण्यात येणार असल्याचा आरोप विरोधकांकडून राज्य सरकारवर करण्यात येत होता. मात्र आता ही डेअरी अमूलकडे न जाता ती मदर डेअरी या दुध व्यवसायातील मोठ्या ब्रँडकडे गेली आहे. त्याचबरोबर महानंदला पुन्हा उभे करण्यासाठी राज्य सरकारकडून मदर डेअरीला तब्बल २५३ कोटी रुपयांचे अर्थसहाय्य केले जाणार आहे.

महानंद डेअरी सर्व सहकारी संस्थाची शिखर संस्था आहे. महानंदच्या आर्थिक स्थितीबाबत राज्य सरकारकडून नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाला कळवले होते. त्यानंतर नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड आणि राज्य सरकारमध्ये पाच वर्षाचा करार झाला. महानंदा डेअरी आता पाच वर्षा मदर डेअरीच्या ताब्यात राहणार आहे. आता ही डेअरी नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाच्या ताब्यात गेली आहे. ‘महानंद’ नॅशनल डेअरी डेव्हलेपमेंट बोर्डाला (national dairy development board) चालवण्यासाठी देण्याचा निर्णय संचालक मंडळाने काही महिन्यापूर्वी घेतला होता. त्यानंतर राज्य सरकारने मंजुरी दिल्यानंतर राजकारण चागलंच तापलं होतं. महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला जात असताना आता दूध व्यवसायही राज्याबाहेर घालवला जात आहे. गुजरातसमोर राज्य सरकार नमतं घेत असल्याचा आरोप किसान महासभेने केला होता. विरोधकांनी देखील हा मुद्दा लावून धरत सरकारवर टीकेची झोड उठवली होती.

गुजरातमधील मदर डेअरी राष्ट्रीय दुग्धविकास विकास मंडळाकडून (एनडीडीबी) चालवली जाते. महानंदची आर्थिक स्थिती डबघाईला आल्याने याच्या पुनरुज्जीवनाची प्रक्रिया सुरु झाली. त्यानंतर संचालक मंडळाने महानंद एनडीडीबीकडे देण्याचा निर्णय घेतला.

ML/ML/SL

9 May 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *