अहमदपूर ला तब्बल 1111 फूट लांब तिरंगा ध्वज रॅली

लातूर, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क): स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने सम्राट मित्र मंडळ आणि नगर परिषद तसेच महात्मा गांधी महाविद्यालयाच्या वतीने आयोजित केलेल्या 1111 फूट लांबीच्या शौर्य , त्यागाचे प्रतीक असलेल्या तिरंगा ध्वज प्रतिकृती तिरंगा रॅलीने अहमदपूरकरांचे लक्ष वेधून घेतले.

अहमदपूर ला तब्बल 1111 फूट लांब तिरंगा ध्वज रॅली

या रॅलीने व देशभक्तीच्या जयघोषाने अहमदपूर शहर अक्षरशः दुमदुमले. रॅलीच्या उद्घाटन सोहळ्याच्या अध्यक्षपदी माजी आमदार बब्रूवान खंदाडे होते तर माजी मंत्री विनायकराव पाटील यांच्या हस्ते फित कापून रॅलीचे उद्घाटन करण्यात आले.

ML/KA/PGB
14 Aug 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *