अजमल कसाब ने प्रवेश केलेल्या बधवार पार्क वर कडेकोट बंदोबस्त
मुंबई, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मुंबईवर झालेल्या 26/11 च्या भीषण दहशतवादी हल्ल्याला आज 14 वर्ष पूर्ण झाली आहेत. या हल्ल्याच्या आठवणीने आजही अनेकांचा थरकाप उडतो. पाकिस्तानच्या ‘लष्कर ए तोयबा’ या दहशतवादी संघटनेच्या दहा दहशतवाद्यांनी समुद्रमार्गी भारतात प्रवेश करून अनेक निरपराध लोकांची बेछूट गोळीबार करून निर्दयपणे हत्या केली .तो क्रूरकर्मा अजमल अमीर कसाब हा कप परेड च्या मच्छीमार नगर येथील ‘बधवार पार्क ‘या समुद्र मार्गी मुंबईत दाखल झाला . त्या बधवार पार्कवर आजही मुंबई पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे.Tight security at Badhwar Park entered by Ajmal Kasab
२६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईतील छत्रपति शिवाजी टर्मिनस, हॉटेल ताज महाल पॅलेस अँड टॉवर, हॉटेल ओबेरॉय ट्रायडेंट, लियोपोल्ड कॅफे, कामा हॉस्पिटल, नरीमन हाउस, मेट्रो सिनेमा, आणि टाइम्स ऑफ इंडिया इमारतीच्या मागील एका गल्लीत अतिरेक्यांनी हल्ला केला होता. या अतिरेक्यांनी निरपराध लोकांवर अंदाधुंद गोळीबार केला व हातबॉम्ब फेकले.या भीषण हल्ल्यात ३४ परदेशी नागरिकांसह १९७ जण ठार तर ८०० पेक्षा अधिक लोक जखमी झाले.
मुंबईच्या इतिहासातील महाभयंकर अशा या हल्ल्यात मुंबई पोलीस व भारतीय सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांना ठार केले . एटीएस प्रमुख हेमंत करकरे,अपर पोलीस आयुक्त अशोक कामटे,पोलीस निरीक्षक विजय साळसकर, व सीएसएमटीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशांक शिंदे हे या हल्ल्यात ठार झाले.एएसआय तुकाराम ओंबळे यांनी प्राणाची आहुती देऊन अजमल कसाबला जिवंत पकडले. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार सर्व हल्लेखोर पाकिस्तानी होते, व या हल्ल्यांमागे लष्करे तोयबा या पाकिस्तानी दहशतवादी संघटनेचा हात असल्याचे स्पष्ट झाले. या हल्ल्यात जिवंत पकडलेला अतिरेकी अजमल कसाब हा २६ नोव्हेंबर रोजी
कफ परेडच्या मच्छीमार नगर येथील बधवार पार्क समुद्रकिनाऱ्यावर कुबेर बोटी मार्गे आपल्या नऊ साथीदारासह उतरला.त्या बधवार पार्क परिसरातील महत्त्वाच्या ठिकाणांची पोलीस उपायुक्त संजय लाटकर यांनी पाहणी केली. बधवार पार्क समुद्रकिनारी पोलिसांचा सशस्त्र बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. होता.पोलीस उपनिरीक्षक देविदास लाब्दे यांच्याकडून उपायुक्त लाटकर यांनी काही माहिती घेतली. तेंव्हा पोलिस अंमलदार उपनिरीक्षक अरविंद सावंत, पोलीस नाईक शहाबुद्दीन सिद्दिक यांच्यासह अन्य पोलिस बंदोबस्तावर होते.त्याच दरम्यान कफ परेड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदेश रेवाळे हे विभागातील मोक्याच्या ठिकाणी असलेल्या पोलीस बंदोबस्ताची माहिती घेत होते. या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये मोठा व्हीआयपी विभाग आहे.गीता नगर,डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर या झोपड़ पट्टी विभागसह मुख्यत्वे येथील लॉंचिंग पॉइंट्स असलेल्या टाटा इन्स्टिट्यूट फंडामेंटल रिसर्च ( टी.आय. एफ.आर.)आणि बुधवार पार्क हे महत्त्वाचे दोन लँडिंग पॉईंट्स आहेत.या ठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त पहायला मिळतो आहे.
SW/KA/PGB
25 Nov .2022