कोटक महिंद्रा बँक ताब्यात घेणार ही फायनान्स कंपनी

मुंबई, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : RBI ने कोटक महिंद्रा बँकेला सोनाटा फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड ताब्यात घेण्याची परवानगी दिली आहे. या वर्षी 10 फेब्रुवारी रोजी कोटक बँकेने सोनाटा फायनान्सचे 100% स्टेक ₹ 537 कोटींना खरेदी करण्याची घोषणा केली होती.सोनाटा फायनान्स ही नॉन बँकिंग वित्तीय कंपनी (NBFC) आहे. हा व्यवहार पूर्ण झाल्यानंतर, सोनाटा फायनान्स ही कोटक महिंद्रा बँकेची पूर्ण मालकीची उपकंपनी बनेल. कंपनीने आपल्या फाइलिंगमध्ये ही माहिती दिली आहे.कोटक महिंद्रा बँकेनेही शुक्रवारी आपल्या फाइलिंगमध्ये आरबीआयकडून मंजुरी मिळाल्याची माहिती दिली. बँकेने सांगितले की, 100% अधिग्रहणानंतर, सोनाटा फायनान्स ही कोटकची ‘बिझनेस करस्पॉन्डंट सब्सिडियरी’ कंपनी बनेल. RBI कडून ही मंजुरी अशा वेळी आली आहे जेव्हा बँक सप्टेंबर 21 ऑक्टोबरला तिमाही निकाल जाहीर करणार आहे.
सोनाटासोबतच्या या करारामुळे बँकेला देशाच्या उत्तरेकडील भागात आपला व्यवसाय विस्तारण्यासही मदत होणार आहे. आर्थिक वर्ष 2023-24 च्या पहिल्या तिमाहीत, कंपनीचा निव्वळ एकत्रित नफा 50.62% ने वाढून ₹4,150.19 वर पोहोचला आहे.
सोनाटा फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड ही मायक्रोफायनान्स कंपनी आहे. कंपनीच्या वेबसाइटनुसार, ती व्यक्ती आणि समूहांना भारतातील अविकसित भागात आर्थिक क्रियाकलापांसाठी कर्ज देते. त्याचे लाभार्थी बहुतेक गावे आणि शहरांतील झोपडपट्टीत राहणारे लोक आहेत.
SL/KA/SL
21 Oct. 2023