या चित्रपटातून बिग बींच्या नातवाचे चित्रपट क्षेत्रात पदार्पण
मुंबई, दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा ‘द आर्चिज’ चित्रपटातून पदार्पण करत आहे. मुंबईतील नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर (NMACC) येथे चित्रपटाचे स्पेशल स्क्रिनिंग आयोजित करण्यात आले होते. यावेळी संपूर्ण बच्चन कुटुंब अगस्त्य ला पाठिंबा देण्यासाठी एकत्र दिसले. अगस्त्य हा अमिताभ यांची मुलगी श्वेता बच्चन आणि जावई निखिल नंदा यांचा मुलगा आहे.
‘द आर्चीज’ हा चित्रपट ‘द रिव्हरडेल’वर आधारित आहे. तो नेटफ्लिक्सवर 7 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. अगस्त्य या चित्रपटात आर्ची अँड्र्यूजची भूमिका साकारताना दिसणार आहे. हा चित्रपट संगीताशी संबंधित आहे. यात सुहाना खान, खुशी कपूर, अगस्त्या नंदा, आदिती सहगल, वेदांग रैना, मिहिर आहुजा, युवराज मेंडा यांसारख्या कलाकारांनी भूमिका केल्या आहेत.
हा चित्रपट 60च्या दशकातील कथा दाखवत आहे. प्रेम, मैत्री आणि ब्रेकअपच्या टप्प्यातून जाणारी ही कथा झोया अख्तरने दिग्दर्शित केली आहे. या चित्रपटात अगस्त्य नंदा आर्चीची मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. सुहाना हायस्कूलमधील सर्वात लोकप्रिय किशोरवयीन व्हेरोनिकाची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात खुशी कपूर व्हेरोनिकाची बेस्ट फ्रेंड म्हणून दिसली आहे. व्हेरोनिका आणि खुशी दोघीही आर्चीच्या प्रेमात पडतात.
SL/KA/SL
6 Dec. 2023