हा अभिनेता घेणार ‘आदिपुरुष’ ची १० हजार तिकीटे

 हा अभिनेता घेणार ‘आदिपुरुष’ ची १० हजार तिकीटे

मुंबई, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ हा प्रभू श्रीरामांचे चरित्र माडणारा चित्रपट येत्या १६ जून रोजी हा चित्रपट मोठ्या पडद्यावर दाखल होतोय. या चित्रपटाचा नुकताच प्रसिद्ध झालेला ट्रेलरही लोकांच्या पसंतीस उतरला आहे. या चित्रपटात’बाहुबली फेम प्रभास हा प्रभू श्रीरामांच्या भूमिकेत दिसणार आहे. तर क्रिती सेनन सीतामाईची भूमिका साकारणार आहे. त्याचबरोबर सैफ अली खान रावणाच्या भूमिकेत दिसणार आहे. दरम्यान बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता रणबीर कपूरने या चित्रपटाची तब्बल 10 हजार तिकिटे खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे.

बॉलिवूडमधील प्रसिद्ध निर्माता अभिषेक अग्रवाल यांनी ‘आदिपुरुष’ चित्रपटाची तिकिटे फ्रीमध्ये देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आता रणबीर कपूरही ‘आदिपुरुष’ चित्रपटाची तिकिटे मोफत वाटणार आहे. चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये रणबीर कपूर ‘आदिपुरुष’ चित्रपटाती 10 हजार तिकिटे खरेदी करणार असल्याचे म्हटले आहे. रणबीर कपूर वंचित समाजातील छोट्या मुलांना हा चित्रपट मोफत दाखवणार आहे.

‘द काश्मीर फाइल्स’ आणि ‘कार्तिकेय 2’ या चित्रपटांची निर्मिती करणारे अभिषेक अग्रवालदेखील चित्रपटाची 10 हजार तिकिटे मोफत देणार आहेत. प्रभू श्रीरामांवर असलेल्या श्रद्धेमुळे त्यांनी हा निर्णय घेतला आहे. तेलंगणातील सरकारी शाळा, अनाथाश्रम आणि वृद्धाश्रमात ही तिकिटे मोफत दिली जाणार आहेत.

7 जून रोजी चित्रपट निर्माते अभिषेक अग्रवाल यांनी जाहीर केले की, ते प्रभासच्या आदिपुरुष या चित्रपटाची 10,000 तिकिटे मोफत देतील. त्यांनी ट्वीटमध्ये लिहिले, “आदिपुरुष सारखा चित्रपट आयुष्यात एकदाचा बनतो. श्रीराम यांच्याप्रती असलेल्या श्रद्धेमुळे मी आदिपुरुष चित्रपटाची 10 हजार तिकिटे मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. तेलंगणामधील सरकारी शाळा, अनाथाश्रम आणि वृद्धाश्रमातील लोकांना ही तिकीटे देण्यात येतील,” असे त्यांनी म्हटले आहे. याबरोबरच त्यांनी मोफत तिकिटासाठी गुगल फॉर्मची लिंकही ट्वीटमध्ये शेअर केली आहे. निर्मात्याचे हे ट्वीट सोशल मीडियावर चर्चेत आहे.

SL/KA/SL
9 June 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *