तृतीयपंथीयांचा मुंबई मोर्चा

मुंबई, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क): महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबविण्यात
येत असलेल्या पोलीस भरती प्रक्रियेत तृतीयपंथी उमेदवारास संधी उपलब्ध करून दिली. त्यात सर्वसाधारण श्रेणीत समाविष्ट केल्यामुळे त्यांना पात्र असूनही स्पर्धेतून वगळले जात आहे. 16 मार्च 1999 च्या राज्य सरकारच्या अध्यादेशानुसार महिलासाठी राखीव विशेष तरतूद केली आहे, त्यानुसार तृतीयपंथीसाठी राखीव तरतूद करण्यात यावी. तसेच तृतीयपंथी हक्क व कल्याण संरक्षण मंडळ महाराष्ट्र राज्य यांचे सामाजिक न्याय विभागाचे पातळीवर ,जिल्हास्तरावरून चालणारे कामासाठी कार्यालयीन प्रतिनिधी म्हणून स्वतंत्र विभाग करण्यात यावा. त्याठिकाणी कर्मचारी म्हणून जिल्हास्तरावर शिक्षणाची पात्रता असलेले पदवीधर तृतीयपंथी व्यक्तीस रुजू करावे या मागणीसाठी तृतीयपंथी हक्क अधिकार संघर्ष समितीच्या वतीने आज आझाद मैदानात मोर्चा काढण्यात आला.
तृतीयपंथीयांचा समाजातील मानाचा स्तर उंचावण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने तृतीय पंथीयांसाठी सन्मानाने शासकीय सेवेत स्थान देण्याचा निर्णय दिला आहे.
तृतीयपंथी हक्क व संरक्षण विधेयक २०१९ पारित होऊन आज चार वर्ष झालीत.
महाराष्ट्र शासनाचे वतीने या कायद्यान्वये ‘तृतीयपंथी हक्क संरक्षण कल्याण मंडळ’ स्थापित केले .त्याअंतर्गत विविध सेवाभावी योजना व उपक्रम राबवून तृतीयपंथी समुदायाला समाजाच्या मूळ प्रवाहात आणणे व त्यांचे जीवनमान व सामाजिक दर्जा सुधारणे यासाठी रचनात्मक कार्यक्रम राबविणे वा सेवेच्या संधी उपलब्ध करून देण्यात याव्यात अश्या पद्धतीने सरकारचे काम असावे असे केंद्र सरकार व सर्वोच्च न्यायालायने कायदेशीररित्या ट्रान्सजेंडर समुदायाला “तृतीय लिंग” म्हणून स्वीकारले आहे आणि त्यांना राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण (NALSA) निकालाद्वारे (NALSA v Union of India) कायदेशीर मान्यता दिली आहे .
असे असताना तृतीयपंथीयांना दिलेले अधिकार कागदावरच आहेत. या निकालाद्वारे, न्यायालयांनी, प्रथमच, ट्रान्सजेंडर व्यक्तींना त्यांची लिंग ओळख पुरुष, महिला किंवा ट्रान्सजेंडर व्यक्ती म्हणून स्व-ओळखण्याचा अधिकार दिला .
त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने ट्रान्सजेंडर व्यक्तींना सार्वजनिक नोकरी आणि शिक्षणात आरक्षण द्यावे, अशी शिफारस केली होती. आता 2023 उजळले तरी सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्देशाची अद्याप अंमलबजावणी होत नाही .त्यामुळे हा मोर्चा काढण्यात आल्याचे या तृतीयपंथीयांनी सांगितले.Third Party’s Mumbai March
ML/KA/PGB
12 Apr. 2023