राज्यातील येणारे सरकार मे महिन्यापर्यंत अस्थिर …

मुंबई, दि. १८ (जितेश सावंत) : देशातील सगळ्यात महत्वाचे राज्य अशी ज्या राज्याची गणना आहे त्या महाराष्ट्र राज्याची निवडणूक अगदी दोन दिवसांवर येऊन ठेपली आहे. निवडणुकांचा निकाल हा सगळ्यांच्या औत्सुक्याच्या आणि कुतूहलाचा विषय आहे. गेली अनेक वर्षे देशातील सार्वत्रिक निवडूक असो वा एखाद्या राज्याची असो मी ज्योतिषस्त्रानुसार निकालांचे अंदाज मांडण्याचा नेहमीच प्रयत्न करीत असतो.
शास्त्रानुसार मत मांडत असताना सर्व बाजूंचा अभ्यास करावा लागतो. निवडणुकांची तारीख,विविध पक्षांच्या पत्रिका,प्रमुख नेत्यांच्या पत्रिका.आणि सर्वात महत्वाचे म्हणजे राज्याची पत्रिका. आत्ताच्या ग्रहमानानुसार राज्यात कोणाची सत्ता येईल ह्या बद्दलचे विश्लेषण मी करणार आहे.
राज्याची पत्रिका धनु लग्नाची असून सध्या राज्याच्या दशमस्थानावरून ग्रहणे होत असल्याने त्याचा परिणाम सत्ताधारी पक्षाला बसणार अश्या प्रकारचे मत मी यापूर्वी दिनांक १४ सप्टेंबर २०२४ रोजी चंद्रग्रहणाचे परिणाम https://mmcnewsnetwork.com/political-social-and-economic-implications-of-the-last-lunar-eclipse-of-this-year/ यात मांडले आहे.
ग्रहणाच्या प्रभावामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात आपण मोठी अस्थिरता अनुभवत आहोत. त्याचप्रमाणे ग्रहणामुळे सत्ताधारी पक्षातील घटक पक्षांचे वाद विकोपास जातील असेही मत मी व्यक्त केले होते ते अगदी तिकीट वाटपापासून, कटेंगे तो बटेंगे या विधानापर्यंत आपण ते आज अनुभवत आहोत.
राज्याच्या दशमस्थानात केतू असल्याने निवडणूक काळात आणि निवडणुकीनंतर देखील काही काळ अस्थिरता पाहावयास मिळेल. १८ मे पर्यंत म्हणजेच जो पर्यंत राहू – केतू बदल होत नाही तो पर्यंत राज्यात कुठलेही सरकार आले तरी मोठी अस्थिरता पाहावयास मिळेल.
राज्यात कोणाचे सरकार येईल ?
दिनांक १५ नोव्हेंबर रोजी शनी मार्गी होत असून त्याच्या फायदा अल्प प्रमाणात सत्ताधारी म्हणजेच महायुतीला होईल. पण दिनांक १६ नोव्हेंबर मधील पौर्णिमेच्या पत्रिकेतील ग्रहांचा विचार केला असता. कन्या लग्नाच्या पत्रिकेत प्रथम स्थानी केतू असून द्वितीय म्हणजेच कुटुंबस्थानी रवी हा ग्रह आपल्या नीच राशीत म्हणजेच तूळ राशीत असल्याने सत्ताधारी पक्षाला प्रतिकूल असून त्यांच्या जागेत घट होणार हे दर्शविते. दशमस्थानातील मंगळ देखील सत्ताधारी पक्षांना अडचणीत आणेल.अष्टम स्थानातील चंद्रामुळे वरून कितीही आव आणला तरीही सत्ताधाऱ्यांची मानसिकता खचलेली असेल.
नवमस्थानी असलेल्या गुरु आणि हर्षल मुळे मंत्रीपदी असलेल्या उमेदवारांना प्रतिकूल.त्याचप्रमाणे ग्रहमानानुसार महायुतीतील हेवेदावे त्यांना अडचणीत आणतील. सध्याचे ग्रहमान विरोधी पक्ष म्हणजेच महाविकास आघाडीकरिता चांगले आहे. परंतु त्यांच्यातील विसंवादामुळे काही ठिकाणी नुकसान संभवते.
सध्या गोचरीचा बुध वृश्चिक राशीत असून राज्याच्या व्यय स्थानी असून दिनांक १६ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ७.३० मिनिटांनी रवीने ( सूर्य ) देखील आपली राशी बदलली असून त्याचे देखील वृश्चिक राशीत आगमन झाले असल्याने सत्ताधारी पक्षाला हे ग्रहमान प्रतिकूल असून त्यांच्या जागेत घट होणार हे निश्चितच आहे त्याचबरोबर जे मंत्री निवडणूक लढवत आहेत त्यातील बहुसंख्य मंत्र्यांना प्रतिकूल आहे.
गुरु हा ग्रह सध्या वक्री आहे. त्याचाही विपरीत परीणाम महायुतीवर होणार आहे.
आपण आता महादशेचा विचार करू . सध्या राज्याची बुध महादशा सुरु असून शनी अंतर्दशा तसेच गुरुची विदशा , निवडणुकीचा दिवस आणि निकालाचा दिवस या दिवशी अनुक्रमे रवी तसेच चंद्राची सूक्ष्मदशा आहे , या सगळ्याचा परिणाम सत्ताधारी पक्षावर म्हणजेच महायुतीवर विपरीत होणार आहे. परंतु या दशेचा संबंध राहुशी येत असल्याने निवडणुकीच्या निकालानंतर काही अकस्मात किंवा नाट्यमय घटना घडू शकतात.
लोकसभेच्या निवडणूक काळात मी देशात कोणाचे सरकार येईल या बद्दल माझे मत मांडले होते https://mmcnewsnetwork.com/is-baat-kiski/ .त्यात कुठल्या पक्षाला यास मिळेल ते नमूद केले होते.
मुख्यमंत्रिपदाचा अंदाज
सध्या उद्धव ठाकरे यांचे नाव मुख्यमंत्री म्हणून घेतले जात आहे पण त्यांच्या पत्रिकेचा अभ्यास केला असता सध्याचा काळ त्या पदाकरिता त्यांना अनुकूल नाही. जी व्यक्ती महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदी बसेल त्याची खुर्ची मे २०२५ पर्यंत अस्थिर राहील. राज्याला तुलनेने तरुण मुख्यमंत्री मिळण्याची शक्यता आहे अथवा एखादा नवा चेहरा ही असू शकतो.
आपण आता पक्षांच्या पत्रिकेचा विचार करूया
भारतीय जनता पार्टी —
मूळ पत्रिकेचा विचार केला असता सध्याचे ग्रहयोग हे पक्षाला प्रतिकूल असल्याने फार मोठे यश मिळणार नाही.
भारतीय जनता पक्षाची धुरा सध्या देवेंद्र फडणवीस यांच्या कडे असून त्यांच्या पत्रिकेचा आढावा आपण मागे घेतला होता
https://mmcnewsnetwork.com/what-astrology-says-about-unexpected-political-events/#google_vignette त्यांच्या करीता सध्या काळ अवघड आहे.
काँग्रेस पार्टी –
काँग्रेस पक्षाच्या पत्रिकेचा विचार केला असता लोकसभेला लिहिल्याप्रमाणे विधानसभेला देखील पक्षाची कामगिरी उत्तम राहील.
शिवसेना उद्धव ठाकरे
पक्ष फुटीनंतर प्रथमच ही निवडणूक होत असून , मूळ पत्रिकेचा विचार केला असता मित्र पक्षाच्या साथीने निश्चितच जागेत वाढ होईल.
राष्ट्रवादी शरद पवार-
पक्षाच्या पत्रिकेचा विचार केला असता पक्ष फुटीनंतर होणाऱ्या निवडणुकीत चांगले यश मिळेल. पक्षाची पत्रिका आणि शरद पवार यांची पत्रिका यामुळे उत्तम यश मिळेल.
राष्ट्रवादी अजित पवार –
यांच्या पत्रिकेचे विश्लेषण देखील मी लोकसभेच्या वेळी केले होते https://mmcnewsnetwork.com/is-baat-kiski त्याच्या देखील प्रतिकूल काळ सुरु असून मोठे यश मिळणे अवघड.
एकनाथ शिंदे-
यांच्या पत्रिकेचा विचार आपण या पूर्वी केला होता https://mmcnewsnetwork.com/what-astrology-says-about-unexpected-political-events/#google_vignette त्यांची कामगिरी चांगली राहण्याची शक्यता ही अधिक आहे. मे २०२५ पर्यंत त्यांना काळ चांगला आहे पण त्यानंतर २०२६ अखेर पर्यंत अडचणींना सामोरे जावे लागेल.
मनसे –
पक्षाच्या पत्रिकेचा विचार केला असता. पक्षाने जरी सत्ता स्थापनेसाठी आमची मोठी भूमिका असेल असा दावा केला असला तरीही फार मोठे यश मिळणे अवघड परंतु मागील संख्येत वाढ होईल.
टीप- उपलब्ध माहितीनुसार /डेटानुसार वरील विश्लेषण केले गेले आहे.
(लेखक — ज्योतिषशास्त्र, शेअरबाजार आणि सायबर कायदा यातील तज्ञ आहेत )
ईमेल: jiteshsawant33@gmail.com