इस बार किसकी सरकार

मुंबई, दि. ३१ (एमएमसी न्यूज नेटवर्क): देशाच्या इतिहासातील सर्वात जास्त टप्प्यातील ही पहिलीच निवडणूक त्यामुळे या निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलेआहे.४ जून रोजी देशात कोणाची सत्ता येईल याची उत्सुकता सर्वानाच लागली आहे. ज्योतिष शास्त्राच्या आधारे, ग्रहमानानुसार मोदी सत्तेत राहतील का इंडिया आघाडीचे सरकार येईल ? याचे माझ्या अभ्यासानुसार मी माझे मत मांडत आहे.
शास्त्रानुसार मत मांडत असताना सर्व बाजूंचा अभ्यास करावा लागतो. निवडणुकांची तारीख,विविध पक्षांच्या पत्रिका,प्रमुख नेत्यांच्या पत्रिका.NDA स्थापनेची तसेच INDIA आघाडीची पत्रिका आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आपल्या देशाची पत्रिका.
भारताची लग्न रास मकर आहे.
नवीन संवत्सर शके १९४६ अर्थातच ‘गुढीपाडवा’ ,नवीन संवत्सराची पत्रिका मांडत असताना ,येणाऱ्या वर्षात विरोधी पक्षाचे बळ वाढेल आणि सताधारी पक्षाच्या कटकटी, त्रास वाढतील, सरकारी पक्षाच्या प्रतिष्ठेला धक्का बसेल. विरोधी पक्षाच्या मनासारख्या घटना घडतील व मे नंतर या देशाच्या राजकारणात मुलभूत/मोठे बदल पाहावयास मिळेल.येणाऱ्या काळात देशात तसेच राज्यात खास करून सरकार /मंत्रिमंडळामध्ये मध्ये मोठे बदल ,तसेच भावी राजकारणाच्या परिवर्तनाची नांदी होताना दिसेल. असे मत मी याआधी मांडले आहे. https://mmcnewsnetwork.com/new-year-2/
मे १९९८ मध्ये NDA ची स्थापना झाली आणि INDIA आघाडीची स्थापना १८ जुलै २०२३ रोजी झाली परंतु ती अमावस्येच्या जवळपास झाल्याने आघाडीकरिता ती थोडी त्रासदायक ठरताना दिसेल.
०४ जून च्या पत्रिकेचा विचार केला तर देशाच्या पत्रिकेत प्रथमस्थानी प्लूटो ,धनस्थानात शनी,तृतीय स्थानात राहू तसेच नेपच्यून,चतुर्थ स्थानी मंगल आणि चंद्र ,पंचम स्थानी रवी,बुध ,गुरु ,शुक्र, हर्षल आणि नवं स्थानी केतू अशी आहे या पत्रिकेनुसार विरोधी पक्षाच्या जागा नक्कीच वाढतील पण सत्ताधारी पक्ष BJP सत्तेच्या जवळ जाण्याचे योग अधिक आहेत.काही नवीन पक्ष BJP सोबत जोडले जातील.
सत्ताधारी पक्षाला फार मोठे यश मिळण्याची शक्यता कमी आहे पण जर असे झाले तर तृतीय स्थानात राहू आणि नेपच्यून असल्याने मोठ्या प्रमाणात फसवेगिरी EVM झाल्याचा आरोप विरोधी पक्ष करेल, तशी शक्यता बळावेल जनतेच्या मनात देखील शंकेची पाल चुकचुकेल.
स्वतंत्र भारताच्या पत्रिकेचा जर विचार केला तर सध्या देशाची चंद्राची महादशा तसेच शुक्राची अंतर्दशा सुरु असून राहूची विदशा सुरु आहे. या पत्रिकेनुसार सुद्धा विरोधी पक्षाच्या जागा नक्कीच वाढतील पण सत्तेच्या जवळ पोहोचण्यास यश मिळणे थोडे अवघड आहे.
महाराष्ट्रात काँगेस पक्षाच्या जागा वाढतील,उद्धव ठाकरे यांना समाधानकारक यश मिळेल तसेच शरद पवार यांनाही चांगले यश मिळेल मागे सांगितल्याप्रमाणे देवेंद्र फडणवीस यांना नुकसान होईल तसेच अजित पवार या दोन्ही नेत्यांची रास कुंभ असल्याने देखील नुकसान होईल. पुढील राजकीय वाटचालीकरता त्रासदायक ठरेल.
अनपेक्षित राजकीय घडामोडींबाबत काय सांगते ज्योतिषशास्त्र…
टीप- उपलब्ध माहितीनुसार /डेटानुसार वरील विश्लेषण केले गेले आहे.
जितेश सावंत
के. पी. विशारद , नक्षत्र सम्राट, वास्तू तज्ञ (Astro Vastu Consultant)
शेअर बाजार (Stock Market) / सायबर कायदा(cyber law) तज्ञ
jiteshsawant33@gmail.com