ट्विटर ची चिमणी आली परत

 ट्विटर ची चिमणी आली परत

मुंबई, दि. ७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : तीन दिवसांपूर्वी ट्विटरचा लोगो बदलल्यामुळे वापरकर्ते काहीसे नाराज झाले होते. ट्विटरचे मालक एलॉन मस्क यांनी तीन दिवसांपूर्वी मोठा निर्णय घेत मोठा धक्का दिला होता. त्यांनी ट्विटरचा लोगो बदलला होता. मात्र आता ट्विटरची चिमणी पुन्हा परतली आहे. त्यामुळे वापरकर्त्यानी निश्वास सोडला आहे.

मस्क यांनी नुकताच प्रसिद्ध निळ्या चिमणीऐवजी श्वानाचा लोगो ट्विटरसाठी वापरला होता. हा बदल पाहून वापरकर्ते हैराण झालेले पाहायला मिळत होते. त्यांनी याआधी आपला पाळीव कुत्रा शिबा इनू फ्लोकीला ट्विटरचे सीईओ बनवले होते. बदलानंतर, शिबा इनू ट्विटरच्या लोगोवर देखील दिसत होता. आता पुन्हा ट्विटरच्या लोगोची चर्चा सुरू झाली आहे. कारण प्रसिद्ध निळी चिमणी ट्विटरच्या लोगोवर परत आली आहे. आता ट्विटर खरोखर ट्विटरसारखे दिसत आहे.

मस्क यांनी ट्विटरचा लोगो बदलून डॉगे का केला? यावर अद्याप कोणतीही स्पष्टता समोर आलेली नाही.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *